औरंगाबादमध्ये एका प्रसिद्ध कीर्तनकार महाराजांचा पॉर्न व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महाराजांचे अश्लील कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि व्हिडिओ क्लिपच्या रूपात व्हायरल झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. जे लोक त्यांना कीर्तनकार म्हणून ओळखतात आणि त्यांचे भक्त झाले होते, त्यांना आता महाराजांचे असे कृत्य पाहून धक्का बसला आहे. जे कालपर्यंत महाराजांच्या पाया पडायचे, तेच आता त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत.Shocking Obscene video of Kirtankar Maharaj of Aurangabad went viral, now action is being demanded
वृत्तसंस्था
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एका प्रसिद्ध कीर्तनकार महाराजांचा पॉर्न व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महाराजांचे अश्लील कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि व्हिडिओ क्लिपच्या रूपात व्हायरल झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. जे लोक त्यांना कीर्तनकार म्हणून ओळखतात आणि त्यांचे भक्त झाले होते, त्यांना आता महाराजांचे असे कृत्य पाहून धक्का बसला आहे. जे कालपर्यंत महाराजांच्या पाया पडायचे, तेच आता त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कीर्तनकाराचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हे महाराज महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. बाबांच्या या अश्लील कृत्यांशी संबंधित दोन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. विशेष म्हणजे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे बाबा हे जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. हे दोन व्हिडिओ समोर आल्यानंतर कीर्तनकार महाराजांवर कारवाईची मागणी वारकरी संप्रदायाच्या संघटनेकडून करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या महाराजांची औरंगाबादसह जिल्ह्याबाहेरील नामवंत कीर्तनकार म्हणून ओळख आहे. परंतु आता परिसरातील एका महिलेसोबत त्यांचे शारीरिक संबंध असल्याच्या दोन व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ पाहून त्यांच्या भक्तांना प्रचंड दु:ख झाले आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे महाराज आणि महिला अनेकदा एकत्र कीर्तन करताना दिसतात. त्यांचा मोठा धर्मनिष्ठ परिवार आहे. दोघांचेही यूट्यूबवर प्रचंड फॉलोअर्स आहेत. मात्र, असे व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या महाराजांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. लाखो लोक त्यांना आपला आदर्श मानतात. हे बाबा आपल्या कीर्तनांद्वारे लोकांना सात्त्विकतेचे आणि संस्काराचे धडे देतात आणि लोक आपापल्या भागात, परिसरात, घरोघरी त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम श्रद्धेने आयोजित करतात. अशा लाखो भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App