शिवसेनेत फूट : बंडखोरांच्या पाठिशी भाजप; अजित पवार – शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्ये!!; मुनगंटीवारांचा दोन्ही नेत्यांना टोला


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेतील फूट आणि बंडखोर आमदारांच्या पाठिशी भाजप या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परस्परविरोधी वक्तव्ये केली आहेत. Shivsena splits : sharad Pawar and ajit Pawar contradicts each other, sudhir mungantiwar targets both

बंडखोरांच्या पाठीशी राज्यातले भाजप नेते असल्याचे सध्या तरी दिसत नाही. हा वाद म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत विसंवाद आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. मात्र हे वक्तव्य करताना त्यांनी शिवसेनेच्या बंडखोरांनी खुद्द त्यांच्यावर निधी वाटपात अन्याय केल्याचा आरोप लावला आहे, तो अजित पवार यांनी फेटाळून लावला आहे. निधी वाटपाचा कोणताही अन्याय केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.मात्र शरद पवारांनी अजित पवारांच्या भाजप संदर्भातल्या विधानाला छेद देणारे वक्तव्य केले आहे. बंडखोरांना भाजपची फूस आहे. कारण त्यांना गुजरात आणि आसाम मध्ये तिथले भाजपचे नेते मदत करत आहे. अजित पवारांनी ते नेते माहिती नाहीत. पण गुजरात आणि आसाममधल्या भाजपच्या नेत्यांची माझा परिचय आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर केले आहे. बंडखोरांची गुजरात आणि आसाम मध्ये सरकारी पातळीवरून व्यवस्था होत आहे. याचा अर्थच भाजपचे नेते त्या बंडखोरांच्या पाठीशी आहेत असा होतो, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये शिवसेनेचे बंडखोर आणि भाजप यांच्या नेमक्या संबंधांबाबत मतभेद असल्याचे दिसून येत आहे. या मुद्द्यावरून भाजपचे महाराष्ट्रातले नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. शिवसेनेतील बंडखोर नेत्यांच्या मागे नेमके कोण आहे? हे अधिक काका-पुतण्यांनी ठरवून घ्यावे आणि मगच बाहेर बोलावे. उगाच भाजपच्या नेत्यांवर आरोप करू नयेत, असा टोला मुनगंटीवार यांनी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही लगावला आहे.

Shivsena splits : sharad Pawar and ajit Pawar contradicts each other, sudhir mungantiwar targets both

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात