शिवसेनेत फूट : एकनाथ शिंदेंचा 37 आमदारांचा कोटा पूर्ण; भाजपची थेट उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!!


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे यशस्वी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा शिवसेना फोडण्यासाठी आवश्यक असलेला 37 आमदारांचा कोटा पूर्ण झाल्याची बातमी आल्याबरोबर ताबडतोब दुसरी बातमी येऊन धडकली आहे. भाजपने त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.Shiv Sena split: Eknath Shinde’s quota of 37 MLAs completed; BJP’s direct offer for the post of Deputy Chief Minister

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना असलेली ऑफरच भाजपने एकनाथ शिंदे यांना दिल्याची बातमी आहे.उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदे शिंदे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 % खाती मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ शिंदेंसह 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या 6 मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्या सर्व मंत्र्यांना नवा सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटात आणखी 4 आमदार सामील झाले आहेत. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह योगेश कदम, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित हे 4 आमदार गुवाहाटीत हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये दाखल झाले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या बरोबर असल्याची ग्वाही दिली.

ठाकरेंच्या इमोशनल आवाहनाला शिंदेंचे व्यावहारिक उत्तर!!

उद्धव ठाकरेंच्या आव्हानानंतर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, असे आवाहन त्यांनी आपल्या ट्विटमधून केले आहे. गेल्या 2.5 वर्षात केवळ घटक पक्षांचाच फायदा झाला मात्र यात शिवसैनिक भरडले गेले. शिवसेनेचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले. त्यामुळे आता महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे आहे, असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आहे.

गुवाहाटीमध्ये सध्या बंडखोर आमदारांची जोरदार खलबते सुरू आहेत. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात प्रताप सरनाईक हे भरत गोगावले यांच्याशी बोलत आहेत, त्यांना पक्षप्रतोदाच्या अधिकारांची माहिती देताना ऐकायला येते आहे. आता तुमची जबाबदारी वाढलीय. सगळ्या आमदारांना व्यवस्थित सांभाळा असा सल्लाही त्यांनी दिलंय. इतकच नाही या चर्चेवेळी तर आधीचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यावर त्यांनी टीकाही केली आहे.

Shiv Sena split: Eknath Shinde’s quota of 37 MLAs completed; BJP’s direct offer for the post of Deputy Chief Minister

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!