प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी एकीकडे मंत्रिमंडळाच्या अखेरच्या ठरणाऱ्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद ते धाराशिव अशी हिंदुत्ववादी नामांतरे करून घेण्याचा फैसला जरूर केला, पण दुसरीकडे सुप्रीम कोर्टात मात्र शिवसेनेचे काँग्रेसी वकील अभिषेक मनु सिंघवी हे राज्यपालांवर शेरेबाजी करताना ते “पवित्र गाय” आहेत का?, असा युक्तिवाद केला. Shivsena lawyer abhishek Manu sighvi asks in Supreme court whether governor is a scared cow?
उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात आपल्या कामकाजाची निरवानिरव करत मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याचा ठराव मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसच्या पुण्याच्या जिजाऊ नगर करण्याच्या प्रस्तावावर प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पण आपले सरकार हिंदुत्ववादी आहे. शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली नाही हे सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे गट आणि भाजपची मागणी म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर करणे ही मात्र पूर्ण करून घेतली.
एकीकडे सरकारच्या अखेरच्या क्षणी आणि निरवानिरव करत असताना शहरांची हिंदुत्ववादी नामांतरे, तर दुसरीकडे शिवसेनेचे काँग्रेसी वकील अभिषेक मनु सिंघवी हे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यावर सुप्रीम कोर्टाचे शेरेबाजी करताना ते “पवित्र गाय” आहेत का? त्यांच्या निर्णयांवर सुप्रीम कोर्टात युक्तिवाद होऊ शकत नाही का? त्यांचे निर्णय नि:पक्ष आणि निर्विवाद आहेत का?, असे सवाल केले.
मात्र राज्यपालांवर शेरेबाजी करताना त्यांनी जो “पवित्र गाय” हा शब्द उच्चारला त्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्ववादाला एक प्रकारे काँग्रेसी वकिलांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्याचे दिसून आले. सुप्रीम कोर्ट रात्री नऊ वाजता फैसला सोनवणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App