घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाच्या नामकरणावरून भाजप आणि शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. भाजपने या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची सूचना पालिकेला केली आहे.
७० % मुस्लिम लोकसंख्या असलेली वस्ती म्हणुन उड्डाण पुलाला सुफी संताच नाव देण्याची मागणी करणारी शिवसेना मग नवी मुंबईच्या विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव द्यायला का तयार नाही. तिकडे तर १०० टक्के कोळी आगरी बांधव ही मागणी करतायत.
मराठी आणि हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि दोन्ही काँग्रेससोबत सत्तेसाठी आघाडी केली. यानंतर शिवसेनेच्या राजकारणात अल्पंख्यांकांचे महत्त्व वाढू लागल्याचे चित्र आहे.
अयोध्येच्या राम मंदिरासाठी आंदोलन उभे करणाऱ्या भाजपला दीर्घकाळ पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यानंतर राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला अनुपस्थित राहणे पसंत केले. ‘Shivaji Maharaj flyover’; Demand for naming the flyover Moinoddin Chishti
विशेष प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाला मोईनोद्दिन चिश्तीचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे .तर ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी भाजप आणि सर्वसामान्य जनतेतून होत आहे. शिवसेनेने मात्र या नामकरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे . सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन सुफी चिश्ती-अजमेरी यांचे नाव देण्याची मागणीच शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, मराठीबाणा सोडला, आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडला.अशी संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत आहे .
Shiv Sena demanding flyover in Mumbai be renamed after Moin-ud-din Chishti. (He played an active role in the war of Ghauri against Prithviraj Chauhan.) BJP demanding that the flyover be named after Chhatrapati Shivaji Maharaj. What do Mumbaikars want?? pic.twitter.com/rsSGSsJS8G — Priti Gandhi (Modi ka Parivar) (@MrsGandhi) June 13, 2021
Shiv Sena demanding flyover in Mumbai be renamed after Moin-ud-din Chishti. (He played an active role in the war of Ghauri against Prithviraj Chauhan.)
BJP demanding that the flyover be named after Chhatrapati Shivaji Maharaj.
What do Mumbaikars want?? pic.twitter.com/rsSGSsJS8G
— Priti Gandhi (Modi ka Parivar) (@MrsGandhi) June 13, 2021
सात महिने पूर्वीपासूनच या उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव देण्याची मागणी भाजपने केली असताना केवळ पुष्टिकरणाच्या राजकारणासाठी वेगळे नाव सुचविले काय? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील पूर्व मुक्त मार्गाजवळून सुरू होणाऱ्या उड्डाणपूलाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे करण्याची मागणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी पालिकेच्या स्थापत्य समितीकडे नऊ डिसेंबर २०२० रोजी केली. तर शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी या उड्डाणपुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी यांचे नाव देण्याची मागणी १० जून रोजी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
शिवसेनेने हिंदुत्व सोडले,मराठीबाणा सोडला, आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाज ही सोडला. #अण्णाभाऊ_साठे म्हणजे सर्वसामान्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज. मानखुर्दच्या उड्डाण पूलास त्यांच नाव देण योग्य असताना #ख्वाजा_गरीब_नवाज चे नाव पुलाला देण्याची शिवसेना खासदाराची सूचना. pic.twitter.com/z4EDtWCIOP — Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) June 13, 2021
शिवसेनेने हिंदुत्व सोडले,मराठीबाणा सोडला, आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाज ही सोडला. #अण्णाभाऊ_साठे म्हणजे सर्वसामान्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज. मानखुर्दच्या उड्डाण पूलास त्यांच नाव देण योग्य असताना #ख्वाजा_गरीब_नवाज चे नाव पुलाला देण्याची शिवसेना खासदाराची सूचना. pic.twitter.com/z4EDtWCIOP
— Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) June 13, 2021
औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सातत्याने अनेक वर्षे करत होते. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हाती आले आणि औरंगाबाद मनपाची सत्ताही ताब्यात असली तरी शिवसेनेने नामकरण केलेले नाही. विशेष म्हणजे औरंगाबादच्या नामकरणाला एमआयएमचा विरोध आहे. पण अमरावतीत शिवसेना आणि एमआयएम यांनी एकत्र येऊन राजकारण सुरू केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ज्यांनी राजकारण केले, त्या शिवसेनेला हिंदुत्वाप्रमाणे आता शिवरायांच्या नावाचे वावडे आहे काय, असा सवाल कोटक यांनी केला आहे. मुस्लिम संतांचे नाव स्थानिक जनतेच्या सहमतीने इतर कोणत्याही विकासकामास देण्याला भाजपचा विरोध नाही. मात्र उड्डाणपुलाच्या नामकरणावरून शिवसेनेकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप कोटक यांनी केला आहे.
यासंदर्भात शेवाळे यांच्याकडे विचारणा केली असता स्थानिक जनतेच्या मागणीनुसार आपण संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून त्यांच्या नावाला मी विरोध केलेला नाही. याबाबत राज्य सरकारला जो निर्णय घेणे योग्य वाटेल तो आपणास मान्य असेल, असे शेवाळे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ज्यांनी तहहयात राजकारण केले त्या शिवसेनेला हिंदुत्वाप्रमाणे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे वावडे आहे काय असाही सवाल उपस्थित होत आहे .
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App