मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे शिवसंग्राम पक्षाने आयोजित केलेल्या शिवसंग्रमाच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला. यावेळी अनेकांना मारहाणही करण्यात आली.Shiv Sena’s Gundgiri in Aurangabad, Shiv Sangram’s meeting caused chaos
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे शिवसंग्राम पक्षाने आयोजित केलेल्या शिवसंग्रमाच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला. यावेळी अनेकांना मारहाणही करण्यात आली.
याबाबत बोलताना शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे म्हणाले, 26 तारखेला मराठा क्रांती संघर्ष मेळावा होणार आहे. त्यासाठीच्या तयारीसाठी पाडेगावमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या लोकांनी हा कार्यक्रम उधळून लावत कार्यकर्त्यांला मारहाण केली.
आमच्या शहराध्यक्षांचा मुलगा डॉक्टर अभिमन्यू माकने याला मारहाण करण्यात आली. ही सरकारी गुंडगिरी आहे. सरकारी पक्षाच्या गुंडांनी येऊन गोंधळ घातला. मात्र मराठा समाज मोगलांना आदिलशहा आणि इंग्रजानाही घाबरला नाही. त्यामुळे सरकारच्या गुंडगिरी ही घाबरणारा नाही हे शिवसेनेने लक्षात ठेवावे .
मेटे म्हणाले की आम्ही आज पडेगावला मेळाव्या बाबत बैठक घेत होतो. त्यावेळी काही सरकारी पक्षाचे गुंड आले, गुंडगिरी केली, आमच्या लोकांसोबत मारामारी केली. उद्धवजी शांत स्वभावाचे आहेत. त्यांना याची माहिती देखील नसेल. मात्र अशा तडीपार गाव गुंडावर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही पोलिस आयुक्तांना भेटून याबाबत तक्रार केली आहे.
मेटे म्हणाले की आमचा मराठा समाज मोघल, निजाम, इंग्रज कुणाला घाबरलो नाही. आम्हाला घाबरवण्याची कुणाची औकात नाही. सरकार प्रश्न सोडवू शकत नाही. आंदोलन करू द्यायचे नाही आणि सभागृहात बोलू द्यायचे नाही. तडीपार गुंडांना पाठवून मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा काम सरकार करीत आहे.
आम्ही गप्प आहोत, याचा अर्थ आमच्या हातात बांगड्या नाहीत हे लक्षात घ्यावे. बीडच्या मोचार्नंतर पोलिसांची वागणूक माज्या सोबत बदलली आहे. माझे प्रोटेकशन सुद्धा काढून घेतले आहे. मी गृहमंत्री मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले असून काही घडलयास त्याला जबाबदार सरकार असेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App