विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधी वाटपात कायम शिवसेनेचा आमदारांना दूजाभाव सहन करावा लागतो, असा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी वारंवार केला आहे. तो आरोप खरा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. Shiv Sena MLAs’ complaint indeed; MLA four times more than Shiv Sena in MLA fund distribution !!; Congress also leads the army
मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी आमदार निधीवाटपात मात्र शिवसेना ही सत्तेतल्या तिन्ही पक्षांत शेवटच्या स्थानी आहे. अगदी काँग्रेसनेही शिवसेनेला मागे टाकले आहे. तर सत्ता वाटपात ज्यांनी अर्थ खाते आपल्याकडे आग्रहाने मागून घेतले तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच राज्यात निधीवाटपात अव्वलस्थानी आहे.
मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधीवाटपात मात्र शिवसेना ही सत्तेतल्या तिन्ही पक्षांत तिसऱ्या स्थानी आहे. अगदी काँग्रेसनंही शिवसेनेला मागे टाकले आहे. तर अर्थ खातं असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच राज्यात निधीवाटपात अव्वलस्थानी आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपुत्र असूनही आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्यालाही मोठा फटका बसलाय. पर्यावरण खात्याकडे 420 कोटींची तरतूद असूनही आतापर्यंत फक्त 3 टक्के म्हणजे 14 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या खात्याचीच ही अवस्था असेल तर शिवसेनेच्या इतर मंत्र्यांबद्द्ल न बोलणंच योग्य ठरेल.
2020 ते 21 या वर्षातील निधीवाटपाची आकडेवारी पाहिली असता सर्वाधिक आमदारसंख्या असणाऱ्या आणि मुख्यमंत्रीपद असणारा शिवसेना पक्ष मात्र यात पिछाडीवर दिसतोय. त्यामुळे किमान समान कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. पण निधीवाटपात मात्र समानता दिसत नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये नंबर दोन वर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळवण्यात मात्र अव्वल ठरली आहे आणि ज्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आहे ती शिवसेना निधी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेसच्याही पिछाडीवर आहे. निधी मिळवण्यात आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागालाही फटका बसला आहे.
पक्षनिहाय निधी शिवसेना 56 आमदार निधी 52255 कोटी
काँग्रेस 43 आमदार निधी 100024 कोटी
राष्ट्रवादी काँग्रेस 53 आमदार निधी 224411 कोटी
हे आकडे आहेत 2020-21 या वर्षात तिन्ही पक्षाकडे असलेल्या खात्यासाठी मिळालेल्या निधीचे. ज्या शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. ज्या शिवसेनेकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यांच्या वाट्याला आलेला निधी सर्वात कमी आहे. विशेष म्हणजे आकड्यांच्या खेळात नंबर दोन वर असलेली राष्ट्रवादी पार्टी निधी मिळवण्यात मात्र सर्वात अव्वल ठरली आहे. शिवसेनेपेक्षा चौपट जास्त निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना मिळाला. तर निधी पदरात पाडून घेण्यात काँग्रेसनही शिवसेनेला मागे टाकले आहे.
पक्ष केलेली तरतूद खर्च (कोटी)
राष्ट्रवादी 2353 49 224411
काँग्रेस 105985 100024
शिवसेना 66549 52255
विशेष म्हणजे निधी वाटपाचा फटका आदित्य ठाकरे यांनाही बसला आहे. पर्यावरण विभागात एकूण 420 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली त्यापैकी फक्त तीन टक्के रक्कम म्हणजे 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. किमान समान कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. पण निधी वितरणाच्या या कड्यावर नजर टाकली तर निधी वाटपात मात्र समानता दिसत नाही. यात सर्वाधिक कोंडी शिवसेनेची होत आहे. शरद पवार यांना सरकार चालवण्याचा अनुभव असल्यामुळे तीन पक्षांना एकत्रित घेऊन सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपुत्र असूनही आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्यालाही मोठा फटका बसलाय. पर्यावरण खात्याकडे 420 कोटींची तरतूद असूनही आतापर्यंत फक्त 3 टक्के म्हणजे 14 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या खात्याचीच ही अवस्था असेल तर शिवसेनेच्या इतर मंत्र्यांची काय असेल याचा विचारच न केलेला बरा.
2020 ते 21 या वर्षातील निधीवाटपाची आकडेवारी पाहिली असता सर्वाधिक आमदारसंख्या असणाऱ्या आणि मुख्यमंत्रीपद असणारा शिवसेना पक्ष मात्र यात पिछाडीवर दिसतोय. त्यामुळे किमान समान कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण निधीवाटपात मात्र समानता दिसत नाही. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. या बातमीत त्यांनी पक्षनिहाय आमदार निधी वाटपाची चौकटच दिली आहे. यावरून शिवसेना आमदारांची तक्रार खरी असल्याचे स्पष्ट होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App