वृत्तसंस्था
ढाका : पाकिस्तानी फौजेने 1971 मध्ये उध्वस्त केलेले रमणा काली मंदिर भारताने पुन्हा बांधून दिले आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे मध्यवर्ती भागात राष्ट्रपती रामनाथ करून यांच्या हस्ते या भव्य मंदिराचे आज उद्घाटन करण्यात आले. या मंदिराच्या उद्घाटनानंतर राष्ट्रपतींनी सहकुटुंब तेथे जाऊन महाकाली मातेची पूजा केली. President Ramnath Kovind to inaugurate Ramna Kali Temple in Dhaka
स्वतंत्र बांगलादेश निर्मितीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या समारंभानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यात राष्ट्रपतींनी रमणा काली मंदिराचे उद्घाटन केले आहे. हे रमणा काली मंदिर ऐतिहासिक आहे.
President Ram Nath Kovind inaugurates the renovated Ramna Kali Mandir in Dhaka, Bangladesh The temple was destroyed by the Pakistani forces during the 1971 war. pic.twitter.com/FP2dLKE7iN — ANI (@ANI) December 17, 2021
President Ram Nath Kovind inaugurates the renovated Ramna Kali Mandir in Dhaka, Bangladesh
The temple was destroyed by the Pakistani forces during the 1971 war. pic.twitter.com/FP2dLKE7iN
— ANI (@ANI) December 17, 2021
मुघल कालापासून ते ढाक्याच्या मध्यवर्ती भागात अस्तित्वात होते. परंतु पाकिस्तानी फौजेने बंगाली हिंदू समाजावर जे अत्याचार केले त्या अत्याचारांमध्ये हे मंदिर उध्वस्त केले. 1971 मध्ये पाकिस्तानी फौजेने जे हिंदूंचे शिरकाण केले ते या मंदिरातच…!! पाकिस्तानी फौजेने सुमारे 250 हिंदूंना मारले. परंतु पाकिस्तानी फौजेला भारतीय सैन्यापुढे हार पत्करावी लागली.
त्यानंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने रमणा काली मंदिर पुन्हा उभे करण्याचे अनेक वर्षे प्रयत्न केले. परंतु त्या प्रयत्नांना त्यावेळी फारसे यश आले नाही. सन 2000 नंतर या प्रयत्नांना पुन्हा वेग आला. 2004 मध्ये त्यावेळेच्या शेख हसीना वाजेद सरकारने हे मंदिर पुन्हा बांधायला परवानगी दिली.
परंतु काम अडले. 2007 मध्ये बेगम खालिदा झिया सरकारने परवानगी दिली. परंतु तेव्हाही काम अडले. अखेर हे मंदिर जेथे होते त्या मूळ जागीं न बांधता अन्यत्र बांगलादेश सरकारने रमणा काली मंदिरासाठी अडीच एकर जागा उपलब्ध करून दिली. 2016 मध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज बांगलादेशच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर या मंदीराच्या कामाला वेग आला. भारताने या मंदिराच्या बांधकामाचा खर्च केला आहे. आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यात रमणा काली मंदिराचे उद्घाटन झाले आहे. या परिसरात राम आणि कृष्ण मंदिरे देखील आहेत. या सर्व परिसराचे नूतनीकरण झाले असून त्याचेही उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App