धुळ्यात परदेशातून आलेल्या महिला डॉक्टरसह मुलाला कोरोनाची लागण


  • नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळून मास्कचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय प्रशासनाने केले आहे. Corolla infection in Dhule with a female doctor from abroad

विशेष प्रतिनिधी

धुळे : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावर कोरोना चाचणी केली जाते.धुळे जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान परदेशातून आलेल्या आणखी दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याने धुळेकरांची चिंता आणखी वाढली आहे.नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळून मास्कचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय प्रशासनाने केले आहे.

इंग्लंडमधून आलेल्या एका महिला डॉक्टरची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. दरम्यान पहिल्यांदा विमानतळावर घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला. पुढे धुळे जिल्ह्यात आल्यानंतर या महिलेची कोरोणा तपासणी केली तेव्हा देखील तिचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु काही दिवसांनंतर त्या महिला डॉक्टरची एका खासगी लॅबमध्ये ही तपासणी केली असता तिला कोरोना झाल्याचा अहवाल आला आहे. तसेच तिच्या मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे.



दरम्यान या दोघांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या परिवारातील आणखी दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्याने चिंता वाढत आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर या चौघांच्या स्वॅबचे नमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. सध्या या चौघा रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Corolla infection in Dhule with a female doctor from abroad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात