Shiv Sena Leaders Beat BJP Leader Govind Kendre : शहरात सेना-भाजपमधील कुरघोडीचे राजकारण नवीन नाही. परंतु आता शिवसेना नेत्यांनीच भाजपच्या ओबीसी जिल्हाध्यक्षाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोविंद केंद्रे यांना शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयात नेऊन जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही मारहाण शिवसेनेचेच राजेंद्र जंजाळ व इतरांनी केल्याचा आरोप केंद्रे यांच्या पुतण्याने केला आहे. पोलिसांत तशा स्वरूपाची तक्रारही देण्यात आली आहे. Shiv Sena Leaders Beat BJP Leader Govind Kendre in Minister Bhumare Office in Aurangabad
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरात सेना-भाजपमधील कुरघोडीचे राजकारण नवीन नाही. परंतु आता शिवसेना नेत्यांनीच भाजपच्या ओबीसी जिल्हाध्यक्षाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोविंद केंद्रे यांना शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयात नेऊन जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही मारहाण शिवसेनेचेच राजेंद्र जंजाळ व इतरांनी केल्याचा आरोप केंद्रे यांच्या पुतण्याने केला आहे. पोलिसांत तशा स्वरूपाची तक्रारही देण्यात आली आहे.
गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. धीरज केंद्रे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयात नेले. त्या ठिकाणी काही शिवसेनेचे गुंड बोलावून भुमरे यांच्या कार्यालयात बेदम मारहाण करण्यात आली. प्रा. गोविंद केंद्रे यांच्यावर सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारीमध्ये धीरज केंद्रे यांनी मंत्री भुमरे यांच्या कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची मागणी पोलिसांना केली आहे.
दुसरीकडे, शिवसेनेतर्फेही पोलीस तक्रार करण्यात आली आहे. आकाश राऊत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मनपा आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी टोकन वाटप सुरू आहे. तेथे टोकनचा काळा बाजार होत असल्याचे लक्षात आल्याने जाऊन पाहिले असता गोविंद केंद्रे हे 1 ते 20 पर्यंतचे टोकन घेऊन त्याचा काळा बाजार करत होते, असा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी केंद्रे यांना रोखले असता तुला संध्याकाळपर्यंत कसा राहतो, अशी धमकी दिली. यावरून तक्रार नोंदवून घेण्याची विनंती पोलिसांत करण्यात आली आहे.
अर्थात, आता पोलीस या प्रकरणाचा छडा लावतीलच परंतु लोकप्रतिनिधींनी शहराच्या समस्यांसाठी झगडायचे सोडून वैयक्तिक दुश्मनी काढण्याच्या या प्रकाराची चर्चा शहरात रंगली आहे.
Shiv Sena Leaders Beat BJP Leader Govind Kendre in Minister Bhumare Office in Aurangabad
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App