मोठी बातमी : मीराबाईचे मेडल गोल्डमध्ये बदलण्याची शक्यता, वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या चिनी खेळाडूवर डोपिंगचा संशय, चाचणी होणार

Mirabai Chanu Gold Medal Chance China Weightlifter Facing Doping Test At Tokyo Olympics

Mirabai Chanu Gold Medal Chance : टोकियो ऑलिम्पिकमधून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकणार्‍या मीराबाई चानूचे मेडल गोल्डमध्ये रूपांतरीत होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्ण जिंकणारी चिनी अ‍ॅथलीट हौ झिहुईवर डोपिंगचा संशय आहे. अँटी-डोपिंग एजन्सीने झिहुईला सॅम्पल-बी चाचणीसाठी बोलविले आहे. तिचा नमुना-ए क्लीन नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. Mirabai Chanu Gold Medal Chance China Weightlifter Facing Doping Test At Tokyo Olympics


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमधून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकणार्‍या मीराबाई चानूचे मेडल गोल्डमध्ये रूपांतरीत होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्ण जिंकणारी चिनी अ‍ॅथलीट हौ झिहुईवर डोपिंगचा संशय आहे. अँटी-डोपिंग एजन्सीने झिहुईला सॅम्पल-बी चाचणीसाठी बोलविले आहे. तिचा नमुना-ए क्लीन नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

चिनी अॅथलीट हौ झिहुई आज आपल्या देशात परत येणार होती, पण तिला थांबण्यास सांगितले गेले आहे. तिची डोपिंग टेस्ट कधीही होऊ शकते. ऑलिम्पिकच्या इतिहासात असे यापूर्वीही घडले आहे जेव्हा डोपिंगमध्ये फेल झाल्यावर एखाद्या खेळाडूचे पदक काढून दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला देण्यात आले आहे. तर त्याचवेळी मीराबाई भारतात परतली आहे. दिल्ली विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

वेटलिफ्टिंग फेडरेशनने म्हटले की – आम्हाला कल्पना नाही

वेटलिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सुवर्ण जिंकणार्‍या चायनीज खेळाडूच्या ए-नमुन्यात शंका आल्यामुळे तिला आता बी-नमुना मागविण्यात आला आहे. जर चिनी खेळाडूचा बी-नमुना सकारात्मक आला तर तो आयओसी आणि टोकियो आयोजन समितीद्वारे जाहीर केला जाईल.

मीराने भारतासाठी पहिले पदक जिंकले

मीराने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. तर चीनच्या हौ जिहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या कांटिका विंडीने कांस्यपदक जिंकले.

5000 अ‍ॅथलीट्सची तपासणी सुरू

ऑलिम्पिकमध्ये 5000 अ‍ॅथलीट्ससाठी रँडम डोपिंग चाचण्या घेतल्या जात आहेत. ही एक नित्य प्रक्रिया आहे. झिहुईसह काही खेळाडूंचे ए-नमुने संशयास्पद असल्याचे आढळले आहे. जर ती डोपिंग टेस्टमध्ये अपयशी ठरली, तर मीराबाई भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरू शकते.

Mirabai Chanu Gold Medal Chance China Weightlifter Facing Doping Test At Tokyo Olympics

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात