प्रतिनिधी
मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, शिर्डी देवस्थानचे विश्वस्त आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मे छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे एक जुने नेते या छापेमारीवर खूश असल्याचे ट्विट केले आहे त्यामुळे शिवसेनेचा हा नेता नेमका कोण आहे? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. Shiv Sena leader due to raids on Rahul Canal; Happy !!; Tweak Nitesh Rane via Twitter !!
Old guard in the sena is super happy because of the Kanal IT raids..Got so many calls .. telling me .. LAGE RAHO!! 😅😅 — nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) March 9, 2022
Old guard in the sena is super happy because of the Kanal IT raids..Got so many calls .. telling me .. LAGE RAHO!! 😅😅
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) March 9, 2022
राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांनंतर शिवसेनेचा जुना नेता खुश आहे. मला अनेक फोन आले आणि त्यांनी “लगे रहो” असं सांगितल्याचं, नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सेनेचा हा नेता कोण अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मंगळवारी शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापा घातला. त्यानंतर थोड्याच वेळात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरीही छापे घातले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App