शिंदे – फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले; मराठ्यांचा सरकारला विरोध संपला!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा समाजाने खूप संघर्ष केला आणि आज त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंबंधित अध्यादेश आणि राजपत्र जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. “सगेसोयऱ्यां”साठी या नवीन शब्दाचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला आहे. राजपत्र आणि अध्यादेश इतक्या लवकर जारी करणे, हे इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केलं आहे. समाज म्हणून त्यांचा विरोध संपला, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली.Shinde-Fadnavis government gave reservation to Marathas; Marathas’ opposition to the government is over!!



मराठा समाजासाठी आज दिवाळी

मराठा समाजाचा लढा यशस्वी ठरल्याने आज मराठा समाजाची दिवाळी असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाज खूप आनंदी आहे, यापेक्षा आणखी काय हवं. मराठा मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. इथंपर्यंत आलो ही मेहनत, ताकद वाया नाही गेली, याचं समाधान आहे. गोदा पट्ट्यांतील 123 गावांनी खूप साथ दिली, संबंध महाराष्ट्रातील मराठा समाज पाठीशी उभा होता, म्हणून हे यश मिळालं आहे,” असं जरांगे म्हणाले आहेत.

मुंबईकडे कूच करण्याआधी आरक्षणाचा अध्यादेश

मनोज जरांगे यांनी वाशीतील विजयी रॅलीदरम्यान सांगितलं की, मराठा समाज मुंबईकडे निघताच सगेसोयऱ्यांचा आदेश निघाला आहे. हा विजय माझा नसून सर्व मराठा समाजाचा आहे. सर्व गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. हा विजय मराठा समाजाचा आहे. मराठा समाजासाठी अध्यादेश निघणे ही साधीसुधी गोष्ट नव्हती. मराठ्यांनी आतापर्यंत संघर्ष केला आहे. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत देखील आदेश निघाला आहे. शिंदे समिती पुन्हा कुणबी नोंदी शोधण्याचा काम करणार आहे.

Shinde-Fadnavis government gave reservation to Marathas; Marathas’ opposition to the government is over!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात