विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींनी काढली भारत जोडो न्याय यात्रा; पण INDI आघाडीत वाढला वजाबाकीचाच आकडा!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांच्या राजकीय कृतीतून आली आहे. राहुल गांधींनी पूर्वेकडून पश्चिमेकडे अशी भारत जोडो न्याय यात्रा जरूर काढली. मणिपूर पासून निघून ते आसाम मार्गे पश्चिम बंगाल मध्ये दाखल झाले. Rahul Gandhi launched Bharat Jodo Nyaya Yatra
पण दरम्यानच्या काळात तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या INDI आघाडीला सोडून गेल्या आणि आता बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नीतीश कुमार INDI आघाडीला सोडण्याच्या बेतात आहेत. ते लालूप्रसादांची साथ सोडून परत मोदींच्या साथीला येण्याची दाट शक्यता आहे. बिहार मधल्या सगळ्या राजकीय हालचाली तेच सूचित करीत आहेत.
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा जस जशी पुढे सरकत आहे तसतसेINDI आघाडीतले घटक पक्ष फुटून बाजूला होत आहेत भले सगळेच पक्ष भाजपच्या वळचणीला येणार नाहीत. पण ते आपल्या वळचणीला काँग्रेसला टिकून देत नाहीत ही यातली खरी बातमी आहे.
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणातील “हत्या”, “देशद्रोही” “गद्दार”, “मारा गया” हे असंसदीय शब्द लोकसभेतील रेकॉर्ड मधून हटविले!!
ममता बॅनर्जी किंवा बाकीच्या प्रादेशिक नेत्यांना भाजपचा पराभव जरूर करायचा आहे. आपापल्या राज्यांमध्ये भाजपला त्यांना शिरकाव करू द्यायचा नाही हे खरे, पण त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन त्यांना राहुल गांधींची काँग्रेस मात्र बिलकुलच डोक्यावर चढू द्यायची नाही, ही भारतातली आजची राजकीय वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर INDI आघाडीला गळती लागत आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजकीय युतीचे काय व्हायचे ते होवो, पण मधल्या मध्ये काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या वळचणीला येण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचे हे खरे “फलित” आहे. नुसती मैलोनमैलाची पायपीट, गाडीच्या खिडकीतून हात हलवणे सुरू आहे आणि प्रत्यक्षात पक्षाची संघटनात्मक बांधणी काही नाही, अशी काँग्रेसची अवस्था आहे आणि या अवस्थेत काँग्रेस भाजप सारख्या बलाढ्य पक्षाला टक्कर देण्याच्या स्थितीत नाही. राहुल गांधींना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना नेमक्या राजकीय दुखण्यावर उपाय करता येत नाही, हा काँग्रेस नेतृत्वाचा सगळ्यात मोठा दोष आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App