यमुनानगरमध्ये 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
विशेष प्रतिनिधी
गुरुग्राम : हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे आणि म्हटले की, ‘राम लाट फक्त रामजींना मानणाऱ्यांनाच जाणवते. जे रामजींवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना कोणती लाट येत आहे आणि कोणती जाणार आहे हे कसे समजेल?Haryana Home Minister Anil Vij criticized Congress leader Rahul Gandhi
राहुल गांधींवर टीका करताना विज म्हणाले, ‘ते (राहुल गांधी) इतके ज्ञानी आहेत की ते स्टोव्हमध्ये कोळसे टाकून तो पेटवतात. हे त्यांचे ज्ञान जगभर जात आहे.
आज यमुनानगरमध्ये 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर ‘राहुल गांधी देशभर फिरत आहेत आणि राम लाट नाही असे म्हणत आहेत’ या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला विज हे उत्तर देत होते.
अयोध्येत बांधलेल्या राम मंदिरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विज म्हणाले की, ‘500 वर्षांपूर्वी बाबरने आमचा अपमान करण्यासाठी आमचे मंदिर पाडले होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्याच ठिकाणी मंदिर बांधून आम्ही बदला घेतला आहे, त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App