नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या मंचरच्या सभेपूर्वी तोच वादा नवा दादा!!, अशी भली मोठी पोस्टर्स भोसरी पासून मंचर पर्यंत, अगदी नारायणगाव पर्यंत लागली आहेत. पण त्याच वेळी आपल्याच अनुयायांच्या पराभवासाठी पवारांची ताकद पणाला लागल्याचे चित्रही त्यामुळे जनतेसमोर आले आहे.Sharad pawar’s political energy always wasted in defeating his own followers
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवारांनी शड्डू ठोकल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. पण दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे मानसपुत्र मानले जातात. ते शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या गोटात गेल्याने शरद पवारांनी त्यांच्याविरुद्ध शड्डू ठोकून आंबेगाव मंचर मधून त्यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे उमेदवारीच्या आशेने अनेकांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्या समर्थनाची भलीमोठी पोस्टर्स गावागावांमध्ये लावली आहेत.
कर्जत जामखेडच्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवण्यासाठी रोहित पवार काम करत आहेत, अशी टीका दिलीप वळसे पाटलांनी नुकतीच केली होती. मंचरच्या सभेत येऊन रोहित पवार हे दिलीप वळसे पाटील यांना उत्तर देण्याची अपेक्षा आहे. पण त्या पलीकडे जाऊन शरद पवारांची आपणच तयार केलेल्या अनुयायांच्या पराभवासाठी ताकद पणाला लागल्याचे चित्र या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
95 % बंडखोर आमदार पडले
शरद पवारांना कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत तुमचा पक्ष आणि चिन्ह गेले, याविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी नेहमीचे उत्तर दिले होते. 1981 – 82 मध्ये अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना आपण परदेश दौऱ्यावर गेलो असताना आपल्याबरोबरच्या 54 आमदारांपैकी 51 आमदार काँग्रेसमध्ये निघून गेले होते. पण नंतरच्या निवडणुकीत त्यातले 95 % आमदार पडले. तिथे आपले समर्थक निवडून आले होते. आपल्याविरुद्ध बंड केलेल्या आमदारांना काँग्रेसच्या तिकिटाचाही त्यावेळी उपयोग झाला नव्हता, याची आठवण पवारांनी त्या पत्रकार परिषदेत करून दिली.
*पण याचा अर्थच त्यावेळी म्हणजे 1985 च्या निवडणुकीत शरद पवारांना आपल्याच आधीच्या अनुयायांना पाडण्यासाठी ताकद पणाला लावायला लागली होती. पवारांनी ताकद पणाला लावून त्यावेळी आपलेच आधीचे अनुयायी पाडले होते. त्यावेळी पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे दुसरे 54 आमदार चरखा चिन्हावर निवडून आले होते, हे खरे, पण ते पवारांच्याच आधीच्या आमदारांना पाडून निवडून आले होते. काँग्रेस किंवा बाकी कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांचा पवारांच्या उमेदवारांनी पराभव केला नव्हता. अर्थातच त्यामुळे काँग्रेस किंवा बाकीच्या कुठल्याही पक्षांचे फारसे नुकसानही झाले नव्हते. शिवाय त्या निवडणुकीतही काँग्रेसचेच सरकार महाराष्ट्रात पुन्हा निवडून आले होते. त्यावेळी सुरुवातीला वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले आणि नंतर शिवाजीराव पाटील निलंगेकरांकडे मुख्यमंत्री पद आले होते.
दरम्यानच्या काळात राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस मोडून 1986 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी महाराष्ट्रात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री पदावर होते. 1988 मध्ये राजीव गांधींनी शंकरराव चव्हाण यांना अर्थमंत्री पद देऊन केंद्रात बोलविले. शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन वर्षे त्यांना राजीव गांधींनी कोणतेही पद दिले नव्हते. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राजीव गांधींनी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App