बैल मालकाशी प्रामाणिक राहतो, पण काही लोक काकांना विसरतात; रोहित पवारांची शेरेबाजी; अजितदादा काय प्रत्युत्तर देणार??


प्रतिनिधी

पुणे : ‘बैलाकडे पाहून प्रामाणिक कसं राहावं हे कळतं, जो मालक बैलाला लहानच मोठा करतो, तो मालकाला कधी विसरत नाही. आपण आपल्या आई वडिलांना कधी विसरत नाही, गुरूला कधी विसरत नाही, आपल्या काकांना कधी विसरत नाही. पण आज काल लोक ते विसरतात, अशी शेरेबाजी करून आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचले, वरून पण ते जाऊ द्या, ज्यांना विसरायचं त्यांना विसरु द्या. आपण संघर्ष करू या,” असा टोलाही शरद पवार रोहित पवार यांनी हाणला. rohit pawar to target ajit pawar

त्यामुळे पवार परिवारातील संघर्षामध्ये भाषेची घसरण झाली आता रोहित पवारांच्या या शेरेबाजी वर अजित पवार काय प्रत्युत्तर देणार??, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सुमारे 400 बैलगाडा धारकांनी सहभाग नोंदवला होता. मंगळवारी रात्री उशिरा बैलगाडा शर्यतीची अंतिम शर्यत झाली. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली.

मोदींना बोलण्याचं धाडस नाही…

मराठा आरक्षणाबाबत रोहित पवार म्हणाले, की, ओबीसीमधून आरक्षण द्यायचे की नाही हा सरकारचा प्रश्न आहे, मात्र जे पण आरक्षण दिले आहे हे टिकले पाहिजे. राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून मराठा समाजाला दोन महिन्यापूर्वीच आरक्षण दिले गेले असते. यासोबतच धनगर समाजाला, लिंगायत समाजाला आणि मुस्लिम समाजाला देखील आरक्षण दिले गेले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येतात मात्र या नेत्यांमध्ये त्यांच्याशी या विषयावर बोलण्याचं धाडस नाही.

राज्यात मराठा लोकसंख्या 28 % असताना सरकारने 10 % आरक्षण कसे दिले??, असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला. आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 % टक्के आरक्षण दिले होते. त्यानंतर भाजप सरकारने 13 % आरक्षण दिले आणि आता 10 % आरक्षण दिले आहे, म्हणजेच भाजप मराठा आरक्षणाची टक्केवारी कमी कमी करत आहे, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली.

पण रोहित पवारांच्या बाकीच्या टीकेपेक्षा त्यांनी अजितदादांवर केलेल्या शेरेबाजीची राजकीय वर्तुळात जास्त चर्चा आहे या शेरेबाजीवर अजित पवार काय उत्तर देणार??, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

rohit pawar to target ajit pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात