विशेष प्रतिनिधी
मुंबई : चित्रपट अभिनेता विक्रांत मेसी गेल्या काही दिवसांपासून ’12वी फेल’मुळे चर्चेत आहे. सर्वत्र त्याच्या नावाचा गाजावाजा होत आहे. विक्रांतकडेही चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागली आहे. दरम्यान, अभिनेत्याने धर्माबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या भावाने वयाच्या 17व्या वर्षी इस्लामचा स्वीकार केल्याचेही त्याने उघड केले. आता त्याचे नाव मोईन आहे. विक्रांत मेसीने सांगितले की, तो अशा कुटुंबातून आला आहे जिथे धर्म आणि जातीला महत्त्व दिले जात नाही. त्याच्या कुटुंबात विविध धर्माचे लोक राहतात.Brother converted to Islam at age 17; Father Christian, mother Sikh; Vikrant Massey talked about family
‘अनफिल्टर्ड विथ समदीश’ला दिलेल्या मुलाखतीत विक्रांत मेसीने कुटुंब आणि धर्म तसेच मोठा भाऊ मोईन याबद्दल सांगितले. विक्रांतने सांगितले की त्याचे वडील ख्रिश्चन, आई शीख आणि मोठा भाऊ मुस्लिम आहे. मोईन असे मोठ्या भावाचे नाव असून त्याने वयाच्या 17व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला होता.
विक्रांतच्या मोठ्या भावाने 17व्या वर्षी इस्लाम स्वीकारला
विक्रांत म्हणाला, ‘माझ्या भावाचे नाव मोईन आहे आणि माझे नाव विक्रांत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मोईन हे नाव का? त्याने इस्लाम धर्म स्वीकारला, माझ्या कुटुंबाने त्याला त्याचा धर्म बदलण्याची परवानगी दिली. ते म्हणाले की बेटा, तुला यात समाधान मिळाले तर जा. त्याने वयाच्या 17व्या वर्षी धर्म स्वीकारला, हे एक मोठे पाऊल होते. माझी आई शीख आहे. माझे वडील ख्रिश्चन आहेत आणि चर्चला जातात. ते आठवड्यातून दोनदा चर्चला जातात. लहानपणापासून मी धर्म आणि अध्यात्माबाबत अनेक वाद-विवाद ऐकले आणि पाहिले.
नातेवाइकांनी वडिलांवर प्रश्न उपस्थित केला, त्यांनी चोख उत्तर दिले
पण, ते इतके सोपे झाले नाही. विक्रांतने सांगितले की, जेव्हा मोठ्या भावाने इस्लाम धर्म स्वीकारला तेव्हा नातेवाइकांनी त्याच्या वडिलांवर प्रश्न उपस्थित केले. विक्रांत म्हणाला, ‘माझ्या जवळच्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना विचारले की तुम्ही याला (भावाच्या धर्मांतराला) परवानगी कशी देऊ शकता. ते म्हणाले, याच्याशी तुम्हाला देणेघेणे नाही. तो माझा मुलगा आहे. तो फक्त मला उत्तरदायी आहे आणि त्याला काय हवे ते निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे बघून मी माझा शोध सुरू केला आणि विचार करू लागलो की धर्म म्हणजे काय? ही माणसाने बनवलेली गोष्ट आहे.
विक्रांत मेसीच्या वडिलांचे नाव जॉली आणि आईचे नाव मीना मेसी आहे. विक्रांतने 2022 मध्ये शीतल ठाकूरशी लग्न केले आणि नुकतेच तो एका मुलाचा बाप झाला आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विक्रांत लवकरच एकता कपूरच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय राजकुमार हिरानी यांच्या वेब सिरीजसाठीही त्याच्या नावाची चर्चा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App