विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपण गुगली टाकून फडणवीसांची विकेट घेतली असे म्हणणाऱ्या शरद पवारांवर दिल्लीतून गुगली बिमर स्पिन यॉर्कर सगळे बॉल एकत्र पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अखेर फुटली. ठाकरे – पवारांची घराणेशाही त्यांच्या देखत उध्वस्त झाली. दिल्लीत वर बसलेल्या “पवार शिष्याने% स्वतःची करामत दाखवली आणि पवारांवर गुगली, बिमर, स्पिन, यॉर्कर या सगळ्या बॉलचा एकत्रित मारा करून राष्ट्रवादी फोडली. Sharad Pawar’s NCP split; Ajit Pawar Deputy Chief Minister
राष्ट्रवादीचे 30 आमदार फोडून अजित पवारांनी शरद पवारांना बाय-बाय केला. शरद पवारांचा सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करून पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी पूर्ण उद्ध्वस्त केला.
राजभवनात अजित पवार आता शपथ घेत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदी नेत्यांचा समावेश आहे. शरद पवारांचे उजवे हाच समजले जाणारे प्रफुल्ल पटेल हे देखील राजभवनावर हजर आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App