राजकीय महाभूकंप : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार झाले उपमुख्यमंत्री!


राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का; ३० पेक्षा अधिक आमदार फुटले

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात आज महाभूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस  सरकरामध्ये सामील झाले आहेत. एवढच नाही तर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. Political earthquake Ajit Pawar became Deputy Chief Minister in Shinde Fadnavis government

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे जवळपास ४० आमदार अजित पवारांबरोबर गेले आहेत. अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. शिवाय आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

याशिवाय  छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय  मुंडे, धर्मारावबाब अत्राम, आदिती तटकरे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली असून आणखी काही आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवारांनी केली होती.

Political earthquake Ajit Pawar became Deputy Chief Minister in Shinde Fadnavis government

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात