भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद; पुणे जिल्ह्यातल्या साहेब केसरी बैलगाडा स्पर्धेतून शरद पवारांची दमबाजी!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : देशाचे संरक्षणमंत्री असताना शरद पवारांनी 1992 मध्ये माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्रमातून पाकिस्तानला दम भरला होता. त्याच प्रसंगाची आठवण पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात आली. कारण खेड तालुक्यातल्या साहेब केसरी स्पर्धेतून शरद पवारांनी, भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद आपल्यात आहे, असा देशातल्या विरोधकांना दम भरला. Sharad Pawar victory in the Saheb Kesari bullock cart competition in Pune district

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शरद पवार, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे, असा दम शरद पवारांनी आपल्या विरोधकांना दिला. शरद पवार यांनी बैलगाडा शर्यतीचे कौतुक केले. ते म्हणाले, की आतापर्यंत अनेक शर्यती टीव्हीवर पाहिल्या पण घाटात आल्याशिवाय डोळ्याचे पारणे फिटत नाही.

शरद पवार म्हणाले, की माझी एक तक्रार आहे. सगळ्या भाषणांमध्ये मी ८३ वर्षांचा झालो, ८४ वर्षांचा झालो, असे म्हणतात. तुम्ही माझ काय बघितलं??, अजून, मी काही म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काही चिंता करू नका, अशी दमदाटी शरद पवारांनी विरोधकांना केली.

जे काही तुमचं दुखणं आहे ते लवकरच दूर करु, यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व आपण मिळून करु. लवकरच नवा इतिहास घडवू, असा दावाही शरद पवारांनी केला. सरकारमध्ये शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. कांद्यासह शेतमालाला भाव नाही. कांद्याची निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांवर संकट ओढण्याचे काम होत आहे. मात्र आपण एकजुटीने महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहोत, असे शरद पवार म्हणाले.

मात्र शरद पवारांच्या या दमबाजीच्या भाषणामुळे कै. प्रमोद महाजन यांची आठवण झाली. प्रमोद महाजन आपल्या भाषणातून शरद पवारांची खिल्ली उडवत असत. आमचे संरक्षणमंत्री सीमेवर जाऊन नव्हे, तर माळेगावात जाऊन पाकिस्तानला दम भरतात अशी खिल्ली प्रमोद महाजनांनी त्यावेळी उडवली होती.

Sharad Pawar victory in the Saheb Kesari bullock cart competition in Pune district

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात