मेट्रोच्या दरवाजात कपडे अडकल्याने महिलेचा मृत्यू, सेन्सर काम करत नसल्याची माहिती उघड!

  • मेट्रोने प्रवास करण्यासाठी मुलांसोबत आली होती

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : दिल्ली मेट्रोमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेची साडी आणि जॅकेट दिल्ली मेट्रोच्या दरवाज्यात अडकल्याने तिचा मृत्यू झाला आणि ती अनेक मीटरपर्यंत फरपटत गेल्याने गंभीर जखमी झाली होती. अखेर तिचा मृत्यू झाला.A womans death due to clothes getting stuck in the door of the metro information revealed that the sensor is not working

दिल्ली मेट्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव रीना देवी असे आहे, ती नांगलोई येथे २ आणि १४ वर्षांच्या दोन मुलांसह राहत होती. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, ही घटना १४ डिसेंबर रोजी इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर घडली जेव्हा महिला तिच्या मुलासोबत नांगलोईहून मोहन नगरच्या दिशेने जात होती.



या घटनेच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की दिल्ली मेट्रोच्या दरवाजाचे सेन्सर काम करत नव्हते, त्यामुळे कपडे अडकल्यावरही काहीच समजले नाही परिणामी हा अपघात झाला. ट्रेनने महिलेला कित्येक मीटरपर्यंत ओढत नेले अखेर ती रुळांवर पडली. घटनेनंतर तिला तातडीने सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले आणि न्यूरो सर्जरीच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रवक्ते अनुज दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर घटना घडली, जिथे प्रथमदर्शनी असे दिसते की एका महिला प्रवाशाचे कपडे ट्रेनच्या दारात अडकले आहेत. त्यामुळे ती जखमी झाली. त्यानंतर शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते पुढे म्हणाले की, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) या घटनेची चौकशी करतील. सीएमआरएसला अल्पावधीत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

A womans death due to clothes getting stuck in the door of the metro information revealed that the sensor is not working

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात