ड्रोनद्वारे शस्त्रांची तस्करी कोण करतंय हे आम्हाला माहीत आहे, असंही भारताने म्हटलं आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दहशतवादाबद्दल भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सुरक्षा परिषदेत (UNSC) सीमेपलीकडील दहशतवादामुळे भारताला झालेल्या मोठ्या नुकसानीचा संदर्भ देताना कंबोज म्हणाल्या की, दहशतवादी गट आपल्या देशाला लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर करून सीमेपलीकडून अवैध शस्त्रांची तस्करी करतात. सुरक्षा परिषदेत ‘स्मॉल आर्म्स’ या विषयावरील खुल्या चर्चेत कंबोज यांनी हे भाष्य केले.India scolded Pakistan in the United Nations General Assembly on the issue of terrorism
पाकिस्तानकडे इशारा करत त्यांनी म्हटले की, ‘दहशतवादी गट आमच्या सीमेवरून शस्त्रांची अवैध तस्करी करून सीमेपलीकडील दहशतवाद आणि हिंसाचाराच्या घटना घडवून आणतात, त्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि आता यात ड्रोनचाही समावेश आहे.’
कंबोज म्हणाल्या की, या दहशतवादी संघटनांकडे असलेल्या शस्त्रास्त्रांचे प्रमाण आणि गुणवत्तेत झालेली वाढ इतर देशांच्या पाठिंब्याशिवाय ते अस्तित्वात राहू शकत नाहीत याची आठवण पुन्हा पुन्हा करून देते.
भारत वेळोवेळी जगाच्या प्रत्येक लहान-मोठ्या व्यासपीठावरून पाकिस्तानचा खरा चेहरा आणि त्याच्या खोडसाळ कारवायांबद्दल जगाला सतर्क करत असतो. भारताच्या संपूर्ण नाकाबंदीमुळे पाकिस्तान FATA च्या ग्रे लिस्टमध्ये आला. त्यानंतर, काळ्या यादीत टाकले जाऊ नये म्हणून, त्याला दहशतवाद्यांविरोधात कॉस्मेटिक कारवाई करण्यास भाग पाडले गेले. भारतीय अधिकाऱ्यांनी 2023 मध्ये संयुक्त राष्ट्रात अनेक वेळा पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App