विशेष प्रतिनिधी
पुणे : सार्वजनिक जीवनात किंवा राजकीय जीवनात निवडणुका लढवलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. जिथे अनुकूल वातावरण असतं, तिथे त्याप्रमाणे निर्णय घेतले जातात. पण आता यांच्या (अजित पवार) मनात नक्की काय आहे, हे मला माहिती नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. Sharad Pawar said I don’t know what’s in Ajit Pawar s mind
बारामतीमधून निवडणूक लढवण्यात आता रस नसल्याचे अजित पवारांनी म्हटले होते. याबाबत शरद पवारांना विचारणा केली असता त्यावर ते म्हणाले त्यांच्या मनात काय मला माहित नाही.
पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या का हे मला माहिती नाही. निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारायला हवा. आम्ही त्याबाबत काय बोलणार? १५ ऑगस्टला पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं त्यात वन नेशन, वन इलेक्शन ही संकल्पना त्यांनी मांडली. याचा अर्थ एकाच वेळी सगळ्या निवडणुका व्हाव्यात याचा आग्रह पंतप्रधानांचा होता. दुसऱ्याच दिवशी तीन राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या गेल्या. याचा अर्थ पंतप्रधानांच्या म्हणण्याला आता फारसं काही महत्त्व द्यायचं कारण नाही. कारण पंतप्रधान बोलतात एक आणि निर्णय दुसराच होतो याची प्रचिती आपल्याला आली.
Kolkata rape : मृत्यूपूर्वी पीडितेला दिल्या जखमा, बलात्काराची पुष्टी, पण फ्रॅक्चर नाही; कोलकाता घटनेचा तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून होणार्या निधी वाटपावर पवार म्हणाले, काल माझ्याकडे एका शिक्षण संस्थेची बैठक होती. आज सकाळीही रयत शिक्षण संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची माझ्याबरोबर बैठक होती. या सगळ्यांचं म्हणणं होतं की राज्य सरकारकडून येणाऱ्या स्कॉलरशिपच्या रकमा मोठ्या प्रमाणावर थकलेल्या आहेत. राज्य सरकारच्या इतर अनेक योजना, छोट्या घटकांना दिलेल्या सुविधा यासाठी लागणाऱ्या रकमेची तरतूद आज नाही. असं असताना आणखी नवीन आर्थिक बोजा वाढवायला नको. शेवटी मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी यावर भूमिका मांडतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App