नाशिक : लोकसभा निवडणुका त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका आणि आता साखर कारखान्यांच्या निवडणुका यात शरद पवारांनी खेळी केली. मुलीला “सेफ” ठेवून पुन्हा नातवाचाच राजकीय बळी द्यायची तयारी चालवली.
मध्यंतरी शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना साखर कारखान्यांच्या राजकारणात लक्ष घालायला सांगितले होते. तशा बातम्या देखील मराठी माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. पवारांनी “पॉलिटिकल रिव्हर्स स्विंग” टाकून मुलीला केंद्रीय राजकारणातून थेट साखर कारखान्याच्या राजकारणात आणली की काय??, शंका अनेकांनी उपस्थित केली होती.
पण त्यानंतर आज वेगळीच बातमी समोर आली. शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार बारामती तालुक्यातील सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका लढवायच्या तयारीत असल्याची ही बातमी आहे. स्वतः युगेंद्र पवार यांनीच त्याचे सुतोवाच केले. सोमेश्वर साखर कारखाना माळेगाव साखर कारखाना आणि एकूणच ऊस आणि साखर क्षेत्र पवार साहेबांचे फार मोठे काम आहे. दोन्ही कारखाना क्षेत्रांमध्ये आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, तर निवडणुका का लढू नयेत??, असा सवाल युगेंद्र पवार यांनी करून निवडणुकीत आपण उतरण्याची तयारी करत असल्याचे दाखवून दिले.
याचा अर्थ सुप्रिया सुळे आता अजितदादांची सत्ता असलेल्या साखर कारखान्यांच्या निवडणुका न लढवता युगेंद्र पवार यांच्यामार्फत त्या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी शरद पवारांनी केल्याचे दिसून आले. अजितदादांनी माळेगाव आणि सोमेश्वर या दोन्ही साखर कारखान्यांची सत्ता तावरे गट आणि काकडे गट यांच्याकडून खेचून घेतली, पण त्यावेळी अजितदादांच्या पाठीशी सगळ्या पवार घराण्याची साथ होती. आता मात्र पवार घराणे फुटून अजितदादांच्या सख्ख्या नातेवाईकांना निवडणुकीच्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक हरल्या. युगेंद्र पवार विधानसभा निवडणूक हरले. त्याआधी मावळ लोकसभा निवडणूक पार्थ पवार हरले होते. पण शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना एकदाही पराभवाला सामोरे जावे लागले नाही.
शरद पवारांनी स्थानिक निवडणुकांमध्ये अजित पवार आणि केंद्रीय निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे अशी विभागणी करून दिल्यामुळे बरीच वर्षे पवार कुटुंब राजकीय दृष्ट्या देखील एकत्र राहिले होते. पण बळकट राजकीय कर्तृत्वाच्या अभावी केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणांची सत्ता हातातून निसटली. त्यामुळे तडजोडीची वेळ आली. अजित पवार कुटुंबापासून राजकीयदृष्ट्या बाजूला होऊन भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेले. पण त्याची राजकीय किंमत आपल्या सख्ख्या घरातल्या दोन नातेवाईकांच्या पराभवाच्या रूपाने त्यांना मोजावी पण लागली. स्वतः शरद पवारांना मात्र असली कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली नाही.
आता सुद्धा सोमेश्वर आणि माळेगाव कारखान्यांच्या निवडणुकीत अजितदादांचीच ताकद भारी पडणार आहे, असे दिसताच, पवारांनी “सेफ गेम” करत आपल्या मुलीला म्हणजे सुप्रिया सुळे यांना बाजूला ठेवून अजितदादांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवारांना पुढे केले. त्यामुळे साखर कारखान्यांच्या निवडणुका जिंकले तर अजितदादा आणि हरले तर त्यांचेच पुतणे, अशीच पवारांची यातून खेळी समोर आली. बाकी सुप्रिया सुळे यांना साखर कारखान्यांच्या निवडणुकीत लक्ष घालायला सांगणे ही पवारांची नेहमीप्रमाणे “कात्रजघाटी राजकीय हूल” होती!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App