विशेष प्रतिनिधी
पुणे : शरद पवारांनी बारामतीच्या शिर्सुफळ मध्ये युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत भाषण करताना निवृत्तीचे संकेत दिले. तशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या, पण पवारांनी खरंच निवृत्तीचे संकेत दिले की बारामतीसाठी पुन्हा इमोशनल कार्ड खेळले??, असा संशय तयार झाला आहे.
कारण पवारांनी निवृत्तीचे संकेत अनेकदा दिले. अगदी आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीचा प्रकाशनात त्यांनी थेट निवृत्तीच जाहीर करून सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष केले. परंतु, नंतर मोठा पोलिटिकल महाएपिसोड घडवून शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीच्याच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले. त्यांनी निवृत्तीचे संकेत पूर्णपणे झुगारून लावले. नंतर अजित पवारांना बंड करावे लागले. त्यातून शरद पवारांची राष्ट्रवादीच्या आपल्या गटाच्या अध्यक्षपदावरची खुर्ची त्यांनी जास्त बळकट करून घेतली.
Rajeev Chandrasekhar राहुल गांधींनी वायनाडच्या जनतेचा केला विश्वासघात – राजीव चंद्रशेखर
आज शिर्सुफळ मध्ये भाषण करताना पवारांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली. तुम्ही मला कधी घरी पाठविले नाही. सतत कामात ठेवले. 1967 पासून मी विधिमंडळात किंवा पार्लमेंट मध्ये आहे. तुम्ही मला संधी दिली. नंतर अजितदादांना दिली. सुप्रिया सुळे यांना निवडून दिलेत. आता पुढच्या 30-40 वर्षांची व्यवस्था करायची म्हणून तुम्ही युगेंद्र पवारांना निवडून देऊन संधी द्या. आता मी राज्यसभेची माझी टर्म संपली की पुन्हा राज्यसभेत जायचे की नाही असा विचार करावा लागेल, असे पवार म्हणाले.
पवारांच्या वक्तव्यातला राज्यसभेची टर्म संपली की पुन्हा तिथे जायचे की नाही, या वाक्याचा संदर्भ घेऊन मराठी माध्यमांनी पवारांच्या निवृत्तीचे संकेत अशी बातमी चालवली. परंतु, प्रत्यक्षात पवारांनी काहीच दिवसांपूर्वी सुशील कुमार शिंदेंना उद्देशून काही उद्गार काढले होते. आपल्याला अजून बरेच पुढे जायचे आहे. राज्यात परिवर्तन घडवायचे आहे. 90 वर्षांचे झालो, तरी आपण माघार घ्यायची भाषा बोलायची नाही, असे पवार म्हणाले होते. त्यामुळे पवारांनी आज खरंच निवृत्तीचे संकेत दिले की बारामतीत फक्त इमोशनल कार्ड खेळले??, याविषयी संशय तयार झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App