विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर shahu maharaj कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मधुरिमा राजे छत्रपती यांनी अचानक माघार घेऊन काँग्रेसची नाचक्की झाली पण या सगळ्या उलथापालथीच्या राजकारणामध्ये खासदार शाहू महाराजांना नेमका काय लाभ झाला??, याविषयीची चर्चा दबक्या आवाजात कोल्हापुरात सुरू झाली.shahu maharaj
या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पॉलिटिकल स्टोरीज समोर आल्या. त्यापैकी शाहू महाराज विरुद्ध सतेज पाटील यांच्यातल्या संघर्षाची स्टोरी आणि त्याचबरोबर खुद्द शाहू महाराजांच्या घराण्यातले राजकीय मतभेद यांचीही स्टोरी समोर आली. मूळातच शाहू महाराजांना आपल्या घरात दुसरे सत्ता केंद्र नको होते. त्यामुळे एकदा स्वतः काँग्रेसची खासदारकी घेतल्यानंतर दुसरा कोणी व्यक्ती सत्ताकेंद्र बनून घरातच येणे हे त्यांना मंजूर नव्हते असे बोलले जात होते. परंतु, तरी देखील शाहू महाराजांनी मधुरिमा राजे यांना उमेदवारी घेण्यास मान्यता दिली.
दरम्यानच्या काळात राजेश लाटकर यांनी अर्ज भरून तो माघार घ्यायला नकार दिला. त्यावेळी शाहू महाराज मधुरिमा राजे आणि मालोजीराजे हे स्वतः राजेश लाटकर यांच्या घरी गेले. त्यांना माघार घेण्यासाठी गळ घातली. परंतु राजेश लाटकर यांनी ऐकले नाही. उलट राजेश लाटकर यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना प्रतिप्रश्न केला, आमच्यासारख्या सामान्य घरातल्या मुलाला तुम्ही न्याय देणार की नाही??, त्यावेळी शाहू महाराजांनी आपल्या सुनेला माघार घेऊन तुमच्या मुलाला न्याय देऊ, असे सांगितले, असा दावा शिवसेनेचे नेते सुनील मोदी यांनी केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या 10 मिनिटे आधी काल राजेश लाटकर यांच्या वडिलांचा पुन्हा एकदा शाहू महाराजांना फोन आला. त्यामुळे सगळी चक्रे फिरली. शाहू महाराजांनी मधुरिमा राजे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला, असे सुनील मोदी यांनी सांगितले.
कोल्हापुरातल्या या सगळ्या उलथापालथीच्या राजकारणात काँग्रेसची नाचक्की झाली. कारण कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येऊन देखील आता हाताचा पंजा हे चिन्ह त्या मतदारसंघात उरले नाही. भाजप आणि ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेसला चिमटे काढले. पण शाहू महाराजांनी एका सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला न्याय दिला, असे त्यांचे प्रतिमा वर्धन मात्र झाले. शिवाय कोल्हापूरच्या राजघराण्यात शाहू महाराजांशिवाय दुसरे कुठलेही सत्ताकेंद्र तयार झाले नाही, हे सगळे काँग्रेसच्या नाचक्कीच्या बदल्यात झाले. सतेज पाटलांचा संताप झाला. आज त्यांनी त्या सगळ्या विषयावर पडदा टाकला. तरीदेखील कोल्हापूरचा सगळा एपिसोड संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. काँग्रेसच्या नाचक्कीच्या बदल्यात खासदार शाहू महाराजांचे प्रतिमा वर्धन करायचा प्रयत्न झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App