Jay Shah जय शाह अध्यक्षपदाचा कार्यकाळ १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Jay Shah भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यांचा आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यकाळ १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सध्या शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत. जय शाह आयसीसी अध्यक्षपदी विराजमान होण्यापूर्वी बीसीसीआयला नवीन सचिव शोधावे लागतील. मंडळाचे नवे सचिव म्हणून एक नाव पुढे केले जात असून लवकरच त्याची घोषणा होऊ शकते. Jay Shah
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे सचिव म्हणून रोहन जेटली यांच्या नावाचा विचार केला जात आहे. रोहन जय शहा सारखे तरुण आहेत. ते व्यवसायाने वकील असून क्रिकेट प्रशासनात सचिव आहेत. रोहन सध्या दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहेत. त्यांच्या देखरेखीखाली दिल्ली प्रीमियर लीग सुरू झाली असून त्यात युवा क्रिकेटपटूंना भरपूर संधी मिळत आहेत. Jay Shah
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या बदलीचे आदेश; काँग्रेसच्या मागणीवर निवडणूक आयोगाची कारवाई!!
बीसीसीआयच्या सचिवपदी रोहन जेटली यांच्याशिवाय अनिल पटेल यांचेही नाव पुढे जात आहे. अनिल पटेल हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. जय शाह हे गुजरातचे आहेत, त्यामुळे अनिल पटेल यांचे नावही प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे, परंतु वृत्तानुसार, रोहन जेटली आघाडीवर आहेत.
जय शाह ऑक्टोबर २०१९ मध्ये बीसीसीआय सचिव बनले. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांनी संपत आहे. ते १ डिसेंबरपासून आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. शहा यांच्या आधी चार भारतीयांनी आयसीसी प्रमुखपद भूषवले आहे. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर अशी ही नावे आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App