विशेष प्रतिनिधी
पुणे : Sharad pawar शरद पवारांच्या तोंडी आली मनोज जरांगे यांची स्तुती; त्याचवेळी त्यांनी सांगितले भुजबळांना का नाही केले मुख्यमंत्री!! हा “राजकीय योगायोग” महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ऐन मध्यावर घडून आला. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ एकमेकांचे कट्टर विरोधक असताना शरद पवारांनी जरांगे यांची स्तुती करणे आणि भुजबळांना फटकाराणे याला विशेष महत्त्व आहे!! Sharad pawar
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत पवारांनी मनोज जरांगे यांची तोंडभरून स्तुती केली. मनोज जरांगे यांनी आज जरी निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी त्यांनी त्यांची भूमिका व्यापक केली. निवडणूक जातीवर नेणार नाही, असे त्यांनी सांगितले. ते आता धनगर मुस्लिम आरक्षणाविषयी देखील बोलतात. ते बौद्ध, मुस्लिम, ओबीसी यांच्या विषयी देखील बोलत आहेत. त्यांचा दृष्टिकोन व्यापक होतोय हे चांगले आहे, अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी मनोज जरांगे यांची स्तुती केली. Sharad pawar
त्याचवेळी शरद पवारांनी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री का केले नाही??, याविषयी विशिष्ट गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस पेक्षा जास्त जागा मिळाल्या असताना सगळ्यात सीनियर म्हणून छगन भुजबळ यांचे नाव माझ्या डोळ्यासमोर होते. ओबीसी नेतृत्वाला संधी द्यायची म्हणून भुजबळ यांना बळ दिले. पण भुजबळांचं नंतरच राजकारण पाहिलं, तर त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले. त्यावेळी त्यांच्या हातात महाराष्ट्र दिला असता, तर महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक झाली असती त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री केले नाही हे बरेच झाले, असे शरद पवार म्हणाले. Sharad pawar
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवार, छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली असती. त्या भीतीपोटी ते सगळे भाजपबरोबर गेले, पण मी त्यांना स्पष्ट सांगितले होते, तुम्ही भाजपबरोबर गेला तर फक्त तुमची फाईल कपाटात जाईल. पण ती फाईल कधी नष्ट होणार नाही. त्यामुळे आपण भाजपबरोबर जाण्यापेक्षा संघर्ष करू, पण त्यांनी माझे ऐकले नाही, असा दावा शरद पवारांनी या मुलाखतीत केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App