वृत्तसंस्था
जबलपूर : सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, जगात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पुढे ते म्हणाले, जग शांततेसाठी भारताकडे पाहत आहे, पण काही लोक अडथळे निर्माण करत आहे. भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. Sarsanghchalak
मध्य प्रदेशातील जबलपुर येथे संघ नेत्या डॉ उर्मिला जमादार यांच्या स्मरणार्थ आयेजित कार्यक्रमात भागवत बोलत होते.
Jharkhand : हेलिकॉप्टर, ट्रेन अन् बसने झारखंडमधील दुर्गम भागातील 225 बूथवर पोलिंग पार्टी रवाना
मोहन भागवतांचे ठळक मुद्दे…
सरसंघचालक म्हणाले, युक्रेन-रशिया आणि इस्रायल-हमास युध्दामध्ये तिसऱ्या महायुध्दाची छाया पसरत आहे. इस्रायल किंवा युक्रेन यांच्यातून ते कोणापासून सुरु होईल हे अद्याप स्पष्ट नाही.
भागवत म्हणाले की, जगाने विज्ञानात खुप प्रगती केली आहे, पण याचे फायदे जगातील गरीबांपर्यंत पोहोचलेले नाही, पण जगाचा नाश करणारी शस्त्रेही सर्वत्र पोहोचत आहे. काही आजारांवरची औषधी ग्रामीण भागात पोहोचली नाही, पण गावठी कट्टा इथपर्यंत पोहोचतो.
सरसंघचालकांनी पर्यावरणावरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, पर्यावरणाची अशी अवस्था झाली आहे की पर्यावरणच आजाराचे कारण बनत आहे.
भागवत म्हणाले की, मानवतेची सेवा करणे हाच सनातन धर्म आहे आणि हेच हिंदुत्वातही आहे. हिंदुत्वात जगाला रस्ता दाखवण्याचे सामर्थ्य. हिंदू हा शब्द भारतीय ग्रंथांमध्ये लिहिण्याच्या खूप आधीपासून अस्तित्वात होता. गुरू नानक देवजी यांनी प्रथमच लोकांमध्ये याचा वापर केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App