थोपटेंनंतर पवार आता काकडेंच्या दारी; जुन्या वैऱ्यांची काढावी लागतेय नाकदुरी!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : थोपटेंनंतर पवार आता काकडेंच्या दारी; जुन्या वैऱ्यांची काढावी लागतेय नाकदुरी!!, अशी वेळ शरद पवारांवर आली आहे. Sharad pawar has to bow down infront of his old political rivals

बारामतीत सुप्रिया सुळे यांची निवडणूक पवारांना अवघड होत चालली आहे. त्यामुळे पवार आत्तापर्यंत पूर्ण दुर्लक्ष केलेल्या दुष्काळी गावांच्या भेटी गाठी घेत आहेत. पवारांच्या 55 वर्षाच्या संसदीय कारकीर्दीमध्ये बारामती तालुक्यातील 40 पेक्षा जास्त गावे दुष्काळीच राहिली. बाकीची बारामती बागायतीने फुलली पण सुपा, कारखेल आदी 40 गावे दुष्काळीच राहिली. तिथे पवारांना भेटायला एवढ्या वर्षात वेळ देखील मिळाला नव्हता, पण आता सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीसाठी पवारांना त्या दुष्काळी गावांचाही दौरा करावा लागला आहे.

त्या पलीकडे जाऊन आपल्या जुन्या वैऱ्यांच्या दारात पवारांना जावे लागले आहे. काहीच दिवसांपूर्वी पवार आपले 40 वर्षांचे जुने राजकीय वैरी अनंतराव थोपटे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेते झाले होते. सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीसाठी मदत करण्याचे आवाहन पवारांना अनंतराव थोपटेंना करावे लागले होते. पण याच अनंतराव थोपटेंना 1999 च्या निवडणुकीत पवारांनी पाडले आणि त्यांची मुख्यमंत्री पदाची संधी घालवली होती. अनंतरावांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांना देखील त्यांचा हक्क असून विधानसभेचे अध्यक्षपद पवारांनी मिळू दिले नव्हते, पण सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीसाठी अनंतराव थोपटे यांच्या घरांचे उंबरे मात्र पवारांना झिजवावे लागले.

आता त्यापुढे जाऊन ज्या काकडे कुटुंबीयांशी पवारांचे 50 – 55 वर्षांची राजकीय वैर होते, त्या काकडे कुटुंबीयांशी जळवून घेण्याची वेळ देखील पवारांना आता आली आहे. बाबालाल काकडे आणि संभाजीराव काकडे हे पवारांचे जुने राजकीय वैरी. पुणे जिल्ह्यावरचे आणि विशेषतः बारामती वरचे त्यांचे वर्चस्व मोडून पवारांनी आपली राजकीय कारकीर्द बारामतीत बहरून आणली. यासाठी सुरुवातीपासून त्यांना यशवंतराव चव्हाण यांची ताकद मिळाली, पण तरी देखील संभाजीराव काकडे हे बारामतीतून दोनदा खासदार मिळवण्यात यशस्वी झाले होते, पण त्यांचे पवारांशी राजकीय वैर कायम राहिले होते.

बाबालाल काकडे आणि संभाजीराव काकडे यांचे आधीच निधन झाले आहे. संभाजीराव काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सांत्वन करण्याच्या निमित्ताने शरद पवारांनी आता काकडे कुटुंबीयांची भेट घेतली. मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष शामराव काकडे यांच्या घरी पवार गेले होते.

पण ज्या काकडे कुटुंबीयांशी शरद पवारांनी वर्षानुवर्षाचे वैर पुढे चालू ठेवले, त्या काकडे कुटुंबीयांची अजित पवारांनी मात्र 5 वर्षांपूर्वीच जुळवून घेतले होते. बारामतीतल्या शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे पुत्र अभिजीत काकडे यांना सोमेश्वर नगर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची संधी अजित पवारांनी मिळवून दिली. पण स्वतः शरद पवारांनी मात्र काकडे कुटुंबीयांची वैर तसेच सुरू ठेवले होते. मात्र आता सुप्रिया सुळे यांची निवडणूक अवघड होत असताना पवारांना थोपटे आणि काकडे या त्यांच्या जुन्या राजकीय वैऱ्यांशी जुळवून घ्यावे लागत आहे.

Sharad pawar has to bow down infront of his old political rivals

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात