विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात दोन पक्ष फोडून देवेंद्र फडणवीस आणि भाजपने सत्ता काबीज केली, असा आरोप महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करतात. या आरोपाला आज फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात पक्ष फोडायची स्पर्धा लावली, तर शरद पवारांनाच पक्ष फोडायच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळेल, असा टोला फडणवीसांनी हाणला.
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुंबई Tak’ बैठकीचे आयोजन केले होते. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या राजकारणाचे वाभाडे काढले. सगळ्यात जास्त पक्ष फोडायचे रेकॉर्ड शरद पवारांच्या नावावर आहे. त्यामुळे आम्ही पक्ष फोडले हा सहानुभूतीचा फॅक्टर त्यांनी इको सिस्टीमला हाताशी धरून तयार केला. पण तो एकाच निवडणुकीपुरता चालला. विधानसभा निवडणुकीत सहानुभूती फॅक्टर चालणार नाही, असा टोलाही फडणवीसांनी हाणला.
देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की, ‘मुख्यमंत्री होणार की दिल्लीत जाणार?’ यावेळी त्यांनी आपल्या मनातील गोष्ट सांगितली. फडणवीस म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षात कोणताही निर्णय आपल्या हातात नसतो. आपला निर्णय पक्ष करतो. मी यापूर्वीही सांगितलं आहे, पक्षाने जिथे सांगितलं, ज्या पदावर सांगितलं, जसं सांगितलं त्या पदावर आपण काम करू. एक गोष्ट निश्चित आहे आता मला माझा पक्ष जसा समजतो ते मला महाराष्ट्रात ठेवतील, तिथे काम करायला सांगतील असं मला वाटतं.पण त्यांनी सांगितलं दुसरीकडे करायचंय… अगदी मणिपूरला जाऊन काम करायला सांगितलं तरी माझी तयारी आहे. मला अडचण नाही. पण आता तरी मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात काम करणार आहे आणि मुख्यमंत्री वैगेरे होणं हा माझा अजेंडा नाही.’ अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
Siddheshwarnath temple : बिहारच्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 भाविकांचा मृत्यू; 12 हून अधिक जखमी; पायऱ्या चढताना दुर्घटना
महाविकास आघाडीचे अवघड
महायुतीला विधानसभेत काऊंटर पोलरायझेशनचा फायदा होईल. शिंदेंना जितकी मतं दिली तितकी दादांना देऊ शकलो नाही. पण काळजी करू नका विधानसभेत जागावाटप नीट होईल. ज्याची जेवढी ताकद तेवढ्या त्यांना जागा मिळणार… नवीन अवतारात शिंदे, दादांची पहिली निवडणूक आहे. मागताना जागा प्रत्येकाला जास्तच मागाव्या लागतात. लोकसभेत ताणून धरलेल्या जागांवर परिणाम झाला. आता जागावाटप लवकर व्हावं यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्यापेक्षा जास्त अवघड मविआचं आहे.’ असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
पक्ष फोडण्याच्या स्पर्धेत पवारांना गोल्ड मेडल- फडणवीसांची खोचक टीका
‘फेक नरेटिव्ह एकाच निवडणुकीत चालतो. पवारसाहेब आताही कमीच जागा घेतील. संपूर्ण देशात पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली, तर पवारांनाच गोल्ड मेडल मिळेल. कारण पक्ष फोडायचे रेकॉर्ड तर त्यांच्याच नावावर आहे, अशा खोचक शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत फटका
लोकसभेचे विश्लेषण केले, तर आमच्या १२ जागा अशा आहेत, जिथे वेगळा पॅटर्न दिसला. तो विधानसभेत दिसणार नाही. आमच्याकडे जी मते होती, त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची मते मिळून विशिष्ट जागा मिळवू असे वाटले होते. पण, दुसरीकडे नवीन पक्ष होते, त्यांची मते एकमेकांना गेली नाहीत.”
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मते जाणे, सगळ्यात कठीण होते. पण, आता ते विधानसभेला घडणार नाही. आम्ही जितकी मते शिवसेनेकडे ट्रॉन्स्फर करू शकलो, तितकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे करू शकलो नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App