विशेष प्रतिनिधी
मुंबई : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘छोटा माणूस’ अशी संभावना शरद पवार यांनी केली होती. शरद पवारांचा पटोलेंवरचा राग गेलेलाच नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या घरी बोलावलेल्या कॉँग्रेस नेत्यांच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोलेंना बोलावले नाही. स्वत: पटोले यांनीच हा खुलासा केला आहे. Sharad Pawar did not invite the ‘Chota Manus’ to his house, Nana Patole himself revealed
काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह कॉँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, नाना पटोले यावेळी गैरहजर होते. पटोले म्हणाले, पवार साहेबांनी भेटीचे निमंत्रण मला दिलेच नव्हते. त्यांनी असे सांगितले नव्हते की येताना नानांना पण घेऊन या. आमच्या पक्षाचे नेते भेटून आल्यानंतर त्यांना मी विचारून माहिती घेतली. तेव्हा ओबीसी आरक्षण संदर्भात चर्चा झाली असे सांगण्यात आले. मी माझ्या पक्षाचे काम करतोय. मला राग वगैरे काहीच नाही. तरीही माझ्या पक्षाचे काम करत असताना कुणाला राग येत असेल तर मला अडचण नाही.
पटोले यांनी पुन्हा शरद पवार यांना डिवचत पटोले म्हणाले, याआधीही आम्हाला धोका मिळालेला आहे. 2014 मध्ये काँग्रेसशी दगा झाला. आता २०१४ सारखा धोका पुन्हा मिळू नये यासाठी पक्ष रणनीती आखेल. त्यानुसारच काम केलं जाईल, त्यामुळे आता 2024 मध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात राहुल गांधींच्याच नेतृत्वात काँग्रेसची सत्ता येईल, असे म्हटलेआहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुद्धा नाही.
स्वबळाच्या मुद्द्यावरुन पुनर्विचार करणार का असा प्रश्न विचारला असता पटोले म्हणाले, हा निर्णय पक्षाच्या पातळीवर घेण्यात येईल. मी फक्त एवढंच सांगेन की, काल पवारांनी जे वक्तव्य केलं, तसाच निर्णय त्यांनी २०१४ मध्येही घेतला होता. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय होता. आमच्या पक्षाचाही काय करायचं, कसं करायचं याबद्दलचा निर्णय होईल. ती आमच्या पक्षाची रणनीती असेल. आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचं आमचं धोरण जाहीर केलं आहे. समजा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असं सांगितलं, तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App