विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : भारत-पाकिस्तान दरम्यानच्या १९७१ मधील युद्धातील भारताच्या विजयाच्या निमित्ताने स्वर्णिम विजय वर्षाचा उत्सव देशभर साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ डिसेंबर २०२० रोजी पेटवलेली विजय ज्योत सोमनाथ द्वार येथून १२ जुलै २०२१ रोजी जम्मू काश्मीरमधील बदामी बाग छावणी येथे पोहोचली. In Gupkar Chowk of Srinagar, the tricolor was hoisted flag
त्यानंतर १४ जुलै रोजी श्रीनगरमधील गुपकार रोड आणि एनएच – ४४ वर विजय ज्योत शोभायात्रा काढण्यात आला. श्रीनगर महानगरपालिकेतर्फे गुपकार चौकात तिरंगा फडकविण्यात आला.
याप्रसंगी सैनिक, त्यांचे कुटुंबे, शाळकरी मुले, शिक्षक आणि नागरिक मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पूर्व हिवाळी ऑलम्पियम गुल मुस्तफा देव आणि माउंट एव्हरेस्टची उंची मोजणारी पहिली काश्मिरी महिला नाहिदा मंझूरही सहभागी झाल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App