Sharad Pawar : जयंत पाटलांच्या स्वप्नांना शरद पवारांकडूनच सुरूंग

sharad pawar and Jayant Patil

 

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार ( Sharad Pawar )  गटामध्ये मुख्यंमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्या जयंत पाटलांच्या स्वप्नांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच सुरूंग लावला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसला मुख्यमंत्रीपदाबाबत रस नसल्याचे म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खेळी करत महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली हाेती. काॅंग्रेसचे नाना पटाेले, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी गुघघ्याला बाशिंग बांधले हाेते. राज्यात अनेक ठिकाणी जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री असे बाेर्डही झळकले हाेते. मात्र, शरद पवारांनी आता स्पष्ट केले आहे की आम्ही काेणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्राेजेक्ट करणार नाही.



पत्रकारांशी बाेलताना शरद पवार म्हणाले, मी माझ्या पक्षापुरतं सीमित सांगू इच्छितो की, आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्रि‍पदाबाबत रस नाही. आम्हाला कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला फक्त महाराष्ट्रातील सत्तेत परिवर्तन हवं आहे.महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन करून एका विचाराने राज्यातील जनतेला उत्तम प्रशासन द्यायचं हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कोण असावं आणि कोण नसावं? हा प्रश्न नाही. आम्ही कोणीही असणार नाही. तसेच माझा तर प्रश्नच नाही.

काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत षण्मुखानंद सभागृहात पार पडला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करावा, मी त्यांना पाठींबा देतो.

Sharad Pawar clarify on CM face

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub