Hezbollah : शांतता आणि युद्धबंदीच्या चर्चेदरम्यान, हिजबुल्लाहने इस्रायलवर केला मोठा हल्ला!

Hezbollah

50 क्षेपणास्त्रे डागून केला मोठा विनाश


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. विविध शांतता प्रस्तावांच्या चर्चेदरम्यान, इराण समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने ( Hezbollah )   इस्रायलवर हल्ला केला, इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्सवर 50 हून अधिक रॉकेट डागले. हिजबुल्ला कमांडरच्या हत्येनंतर दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ला करण्याच्या विचारात होती. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी यासाठी इस्रायलला अनेकदा धमक्या दिल्या आहेत.

याआधी इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्रांच्या भांडारावर हल्ला केला होता. युद्धादरम्यान अमेरिकेसह इतर मध्यस्थ शांतता चर्चा आणि युद्धविरामासाठी आग्रही आहेत. शांतता कराराची अंमलबजावणी करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे सध्या पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी कतार आणि इजिप्तच्या नेत्यांची भेट घेतली.



कतारचे परराष्ट्र मंत्री अल थानी यांनी ब्लिंकेन यांची भेट घेतली आणि त्यांनी गाझामधील युद्धविराम चर्चेसाठी वचनबद्धता व्यक्त केली. युद्धबंदीच्या चर्चेसाठी कतारही अमेरिकेच्या पाठिशी उभा आहे. यादरम्यान ब्लिंकेन म्हणाले की, आमचा हेतू सर्वप्रथम हमासला चर्चेसाठी तयार करण्याचा आहे. आमचा संदेश स्पष्ट आहे की आम्हाला युद्धविराम आणि ओलीस कराराला अंतिम रूप द्यावे लागेल.

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे, जेव्हा हमासने इस्रायली शहरांवर पाच हजार रॉकेटने हल्ला केला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले होते. जोपर्यंत हमासचा संपूर्ण नाश होत नाही तोपर्यंत युद्धविराम शक्य नाही, अशी शपथ त्यांनी अनेकवेळा घेतली आहे. या युद्धात आतापर्यंत ४० हजाराहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.

Hezbollah Launches Major Attack on Israel

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात