विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad pawar महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मराठा जात वर्चस्वाचे कार्ड खेळून पाहिले, त्या पाठोपाठ मौलाना सज्जाद नोमानींचा व्होट जिहाद मार्फत पाठिंबा मिळवून पाहिला, पण तरी देखील हिंदू एकजूट आणि लाडक्या बहिणींचा शरद पवारांनी धसका घेतलाच आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात इमोशनल कार्ड बरोबरच पवारांना महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षेचा पुळका आला आहे.Sharad pawar
त्यातूनच पवारांनी गेल्या काही दिवसांमध्ये भाषणांमधून हिंदू एकजुटी विरोधाच्या मुद्द्यांवर आणि महिला सुरक्षेवर भर दिला आहे मध्येच त्यांनी महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री पाहण्याच्या इच्छेचे पिल्लू सोडून दिले आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा होईल, याचा अंदाज येताच त्यांनी त्याची कबुली देऊन टाकली आणि नंतरच महिला सुरक्षेचा विषय भाषणांमधून सुरू केला.
पवारांनी अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच पुणे जिल्ह्यात केलेल्या काही भाषणांमधून याचा प्रत्यय आला. पवारांनी खेळलेल्या एक जातीय वर्चस्व कार्डाच्या विरोधात हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार चालला. तो मुद्दा मतदानापर्यंत कायम टिकला, तर आपले एक जातीय वर्चस्वाचे कार्ड टिकणार नाही हे पवारांच्या ध्यानात येताच त्यांनी “व्होट जिहाद” कार्ड खेळून पाहिले. “व्होट जिहाद” हा शब्द महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा वापरला त्यांनी समाजामध्ये फूट पाडून हिंदू – मुस्लिम वाद वाढवत भाजपची पोळी भाजायचा प्रयत्न केल्याचा आरोप पवारांनी केला.
पण तेवढ्यात मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात त्यांनी शरद पवारांना व्होट जिहादचे “सिपेसालार” म्हटले. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना व्होट जिहादचे “शिपाई” म्हटले. त्यामुळे व्होट जिहाद विरुद्ध हिंदू एकजूट हा विषय चर्चेत आला. म्हणून शरद पवारांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि लाडकी बहीण योजनेच्या आधारे महायुतीने सुरु केलेल्या वातावरणनिर्मितीला छेदण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार आपल्या सभांमध्ये सातत्याने ‘लाडकी बहीण योजने’बाबत बोलत आहेत. राज्य सरकार महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देत आहे, या गोष्टीचा आनंद आहे. मात्र, या पैशांपेक्षा राज्यातील महिलांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे शरद पवार म्हणाले. यासाठी शरद पवारांनी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणासह गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचारांची आकडेवारी मांडली. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर 67,381 महिलांवर अत्याचार झाले. दररोज पाच स्त्रियांवर अत्याचार होतात. महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात 64000 महिला बेपत्ता झाल्या. सरकार एका बाजूला सांगत होते लाडकी बहीण. एका बाजूला 1500 द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला हजारो स्त्रिया बेपत्ता व्हायच्या, हे पाप यांच्या काळात झाले, असा दावा शरद पवारांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातली महिला अत्याचाराची आकडेवारी मात्र पवारांनी दिली नाही.Sharad pawar
– हिंदू एकजुटीची धास्ती
भाजपचे नेत्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सैफ है’ या घोषणांचा सातत्याने उल्लेख केला. यावरही शरद पवारांनी पुण्यातील मतदानाच्या पॅटर्नचे उदाहरण देत ‘व्होट जिहाद’चे नरेटिव्ह खोडून काढायचा प्रयत्न केला. ताना दिसत त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, पुण्याच्या काही भागांमध्ये एक विशिष्ट समाज आहे, हिंदू समाज आहे, त्यांनी भाजपला मतदान केलं, आम्हाला त्याची सवय आहे. इथे असंच मतदान होतं, हे आम्हाला माहिती आहे. अमुक ठिकाणी अमुक होईल, असे आम्ही गृहीत धरलेले असते. याचा अर्थ त्याला तुम्ही ‘व्होट जिहाद’ समजत नाही. ‘व्होट जिहाद’ हा शब्द वापरुन विशेषत: देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकाऱ्यांनी एकप्रकारे या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. आमचा त्याला विरोध आहे, असे शरद पवार म्हणाले. प्रत्यक्षात त्यांनी हिंदू एकजुटीला विरोध केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App