विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीतली फूट आणि फट झाकण्यासाठी काका – पुतण्यांची धांदल, पण आव्हाड आणि मुश्रीफांच्या हातात पायताण आणि चप्पल!!, अशी राजकीय विसंगती शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत निर्माण झाली आहे.Sharad pawar and ajit pawar avoiding targeting each other, but their supporters are thirsty of each other’s blood
पवार काका – पुतणे राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असे सांगत एकमेकांवर बोलायचे टाळत आहेत. एकमेकांवर ते अजिबात टीका करत नाहीत. किंबहुना ते जाहीर सभांमध्ये एकमेकांची नावेही घेत नाहीत, पण त्यांचेच दुसऱ्या फळीतले अनुयायी नेते मात्र पायताण आणि चपलेने हाणायला एकमेकांवर धावून जात आहेत.
शरद पवारांच्या कोल्हापूरच्या सभेत स्वतः पवार यांनी अजित पवार किंवा हसन मुश्रीफ यांची नावेही घेतली नाहीत. हसन मुश्रीफांवर नाव न घेता त्यांनी टीका केली. त्यांच्या घरातल्या महिलांनी ईडीपुढे शौर्य दाखविले, पण कर्त्या पुरुषाला ते दाखवता आले नाही, असे शरसंधान त्यांनी हसन मुश्रीफांवर साधले. अजित पवारांबाबत शरद पवार काल बिलकुलच काही बोलले नाहीत.
पवारांच्या त्याच सभेत जितेंद्र आव्हाड यांची भाषा मात्र घसरली. गद्दारी ही काही लोकांच्या रक्तातच असते. ती आता महाराष्ट्रातल्या काही लोकांमध्ये दिसू लागली आहे. आत्तापर्यंत बिळात लपलेले साप आता बाहेर आले आहेत. त्या सापांना ठेचण्यासाठी हातात पायताण घ्यावेच लागेल. कोल्हापुरात पायताण प्रसिद्ध आहे. ते कोल्हापूरकरांनी घ्यावे आणि इथल्या गद्दाराला ठेचावे, अशी भाषा जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफांना उद्देशून वापरली.
हसन मुश्रीफ यांनी पण तशाच भाषेत आव्हाडांना प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, तेव्हाच राष्ट्रवादीच्या सर्व 53 आमदारांनी शरद पवारांना भाजपबरोबर सत्तेत जाण्यासाठी पत्र दिले होते. त्याच्यावर जितेंद्र आव्हाड्यांनी सही पण केली होती. पण तेव्हा कुठे गेला होता राधासूता तुझा धर्म, पुरोगामी विचार??, असा सवाल मुश्रीफांनी केला.
* ठाण्यामध्ये राष्ट्रवादी संपवण्याचे काम आव्हाड यांनी आत्तापर्यंत केले. आव्हाड मला जुनियर आहेत. त्यांनी पायताणाची भाषा बोलायला नको होती. पण त्यांना माहिती नाही, कोल्हापुरात कोल्हापूरची नाहीतर, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती करकर वाजते. ती आव्हाडांना बसली म्हणजे समजेल, अशा शब्दांत हसन मुश्रीफ यांनी आव्हाडांचे वाभाडे काढले.*
एकीकडे शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे राष्ट्रवादीतल्या फटी आणि फुटी झाकायचा प्रयत्न करत आहेत. आपल्या विविध संस्था आणि संपत्तीची वाटणी सुरळीत व्हावी यासाठी उद्योगपतींच्या घरात चार – चार तास भेटीगाठी घेत आहेत. सार्वजनिक राजकीय व्यासपीठांवर ते एकमेकांची नावेही घेत नाहीत. एकमेकांवर थेट टीकाही करत नाहीत, पण त्यांचे दुसऱ्या फळीतले अनुयायी मात्र हातात पायताण घेऊन एकमेकांवर धावून जात आहेत. हे फूट पडलेल्या आणि न पडलेल्या राष्ट्रवादीतले सध्याचे चित्र आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App