चंद्रावरच्या पॉईंटला नाव दिले शिवशक्ती; मुस्लिम मौलवींना झोंबली मिरची!!


विशेष प्रतिनिधी

लखनौ : भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली. संपूर्ण जगाने या मोहिमेचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज परदेश दौऱ्यावरून थेट बंगलोर मध्ये जात इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांचे खास अभिनंदन केले. तेथे त्यांनी 3 मोठ्या घोषणा केल्या. यापैकी एक घोषणा चांद्रयान तीन जिथे उतरले, त्या चंद्रावरच्या पॉईंटला त्यांनी शिवशक्ती पॉईंट हे नाव दिले. त्याच बरोबर 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्याचे जाहीर केले, तसेच चांद्रयान दोनच्या पाऊलखुणाची ठेव म्हटल्या त्याला “इंडिया” असे नाव दिले. Muslim clerics oppose shivshakti name of Chandrayaan 3 landing point

मात्र पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर उत्तर प्रदेशातील काही मुस्लिम उलेमा आणि मौलवी भडकले आहेत. त्यांनी चंद्रावरच्या पॉईंटला शिवशक्ती हे नाव द्यायला विरोध केला आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाली याचा आम्हालाही आनंद झाला आहे. पण चंद्रावरच्या पॉईंटला कोणत्या देवी देवतांचे नाव देणे योग्य नाही. ते आम्हाला आवडले नाही, असे उत्तर प्रदेशातील बरेली येथील ऑल इंडिया मुस्लिम जमातचे प्रमुख उलेमा मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेली यांनी म्हटले आहे.

शिया समाजाचे मौलवी सैफ अब्बास नकवी यांनी देखील शिवशक्ती नावाला विरोध दर्शविला आहे. चंद्रावरच्या पॉईंटला शिवशक्ती हे नाव देणे भारतातल्या तसे जगातले अनेकांना आवडणार नाही, असा दावा नकवी यांनी केला आहे.

चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक आपले यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला. अमेरिका रशिया आणि चीन या जगातल्या विकसित देशांवर भारताने मात केली, पण तिथल्या पॉईंटला शिवशक्ती हे नाव दिल्यामुळे मात्र मुस्लिम उलेमा आणि माऊलींच्या नाकाला मिरची झोंबली.

Muslim clerics oppose shivshakti name of Chandrayaan 3 landing point

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात