नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सिंडिकेट – इंडिकेट फुटी नंतर आज 4 जुलै 2023 रोजी सकाळपासून ज्या बातम्या आल्या, त्यापैकी काही बातम्यांची राजकीय संगती लावण्याचा प्रयत्न केला, तर शरद पवार उद्या 5 जुलै 2023 रोजीच्या बैठकीत आमदारांच्या बहुमतापुढे झुकून शिंदे – फडणवीस सरकारच्या सत्तेच्या वळचळणीला जाऊन बसण्याची चिन्हे आहेत. Patel’s secret explosion to confession of challenges
राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचे मतच जर सत्तेच्या बाजूने असेल, तर आपणही लोकशाही तत्वानुसार आमदारांचा निर्णय मान्य करतो, असे शरद पवार उद्याच्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बैठकीत म्हणण्याची शक्यता आहे. खुद्द यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय इतिहास त्याची साक्ष देत आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांना 1980 मध्ये पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर इंदिरा काँग्रेस हाच राजकारणाचा मुख्य प्रवाह आहे, असे सांगून आपली चव्हाण – रेड्डी काँग्रेस गुंडाळून इंदिरा काँग्रेसमध्ये गेले होते. यशवंतरावांचाच निकष मान्य करून शरद पवार उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा कलच जर बहुमताने सरकारमध्ये सामील होण्याचा आहे, तर आपणही लोकशाही तत्त्वानुसार तो मान्य करतो, असे सांगण्याची दाट शक्यता आहे.
लोकशाही तत्त्वानुसार बहुमत मान्य करून सत्तेच्या वळचणीला जाऊन बसणे, हा यशवंत मार्ग आहे आणि तोच शरद पवार यांनी उद्या अवलंबला तर आश्चर्य वाटायला नको, अशी अंतर्गत गोटातली माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 पैकी 51 आमदारांनी सरकारला पाठिंबा देण्याचे पत्र शरद पवारांना दिले होते. पण शरद पवारांनी आयत्यावेळी कच खाल्ली आणि निर्णय घेतला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. अन्यथा अजित पवारांना भाजपने मुख्यमंत्री देखील केले असते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी आज टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आज सकाळी केला होता.
प्रफुल्ल पटेल यांच्या या गौप्यस्फोटाला सायंकाळी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी सरकारला पाठिंबा देण्याचे पत्र तयार केले होते आणि आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. त्यात माझीही सही होती. पण जयंत पाटलांनी ते पत्र शरद पवारांपर्यंत पोहोचू दिले नाही. शरद पवारांना एकाकी कसे पाडायचे?, असे म्हणून जयंत पाटील ढसाढसा रडले होते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच सत्तेच्या वळचणीला जाऊन बसायला तयार होती. केवळ जयंत पाटलांनी पत्र दिले नाही म्हणून ते शक्य झाले नाही, असा होतो.
आजही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पक्षात फूट पडल्याचे पत्र दिलेले नाही. याचा अर्थ राष्ट्रवादीचा 54 आमदारांचा गट आजही वैधानिक दृष्ट्या एकच आहे विधानसभेत आज तरी एकसंध पक्ष म्हणूनच कार्यरत आहे.
तीन बातम्यांची संगती
या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट, त्याला जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली कबुली, राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांना दिलेले पत्र या तिन्ही बातम्यांची संगती लावली, तर आमदारांचे बहुमत सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्याचेच आहे, हे कबूल करून उद्या कदाचित शरद पवार आपण लोकशाही मानतो. त्यामुळे आमदारांच्या बहुमताचा कौल पक्षाध्यक्ष म्हणून मान्य करतो, असे सांगण्याची दाट शक्यता आहे, असे अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more