सत्तेची वळचण 4 : राष्ट्रवादीत फूट पडल्याचा दोन्ही गटांचा अद्याप अर्जच नाही; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा गौप्यस्फोटी खुलासा


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट तयार झाले असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचा अर्ज अद्याप आपल्याकडे दिलेला नाही, असा स्पष्ट खुलासा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे. NCP; Assembly Speaker Rahul Narvekar’s Explosive Disclosure

त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस आजही एकच पक्ष आहे. विधानसभा सचिवालयाकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जी पत्रं दिली आहेत, ती पत्रं प्रत्यक्षात आपल्या समोर आल्यानंतर त्यावर निर्णय घेता येईल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.



अजित पवार आणि अन्य आठ जणांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्या आल्या. शरद पवार विरुद्ध अजित पवार असं संघर्ष रंगला. शरद पवारांनी अजित पवार गटा विरुद्ध मोहिम उघडत राज्यभर दौरा आरंभला. आपल्या परवानगीशिवाय कोणी जिवंतपणे आपला फोटो लावू नये असा इशारा शरद पवारांनी अजित पवारांना दिला, तरी देखील अजित पवारांनी आपल्या कार्यालयात शरद पवारांचा फोटो लावल्याचा व्हिडिओ समोर आला.

या पार्श्वभूमीवर कायदेशीर बाजू तपासली असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षात फूट पडली आहे, असा कोणताही अर्ज विधानसभा अध्यक्षांना सादर केलेला नाही, असे त्यांच्या खुलाशातून स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ कायदेशीर दृष्ट्या आजही राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळात एकच पक्ष आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांसमोर कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय देण्याचा पर्याय आहे.

याचा दुसरा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी अत्यंत चलाखीने पक्षावर दावा सांगताना पक्षात फूट पडल्याचे अधिकृतरित्या मान्य केलेले नाही. त्यामुळे अजित पवारांनी एकसंध राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असाच त्याचा अर्थ होतो आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने सत्तेची वळचण शोधताना आपण कोणत्या कायदेशीर पेच प्रसंगात अडकणार नाही. विधिमंडळात आपली फूट दिसणार नाही, याची काळजीच घेतल्याचे यातून अद्याप तरी दिसून येत आहे.

– पटेल – वळसे – भुजबळ संशस्यास्पद

या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ या तीन संशयास्पद व्यक्ती असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत नमूद केले. हे तीन नेते शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर जातील, हे खरे वाटत नाही. याचा अर्थ शरद पवारांचा या तिन्ही नेत्यांना आतून पाठिंबाच आहे असे दिसते, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे.

NCP; Assembly Speaker Rahul Narvekar’s Explosive Disclosure

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात