विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुढील महिनाभरामध्ये दिल्लीत मोठ्या घडामोडी होणार आहेत म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनाला पंढरपुरात यायला शरद पवारांना ( sharad pawar )वेळ नाही. ही माहिती दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे, विधान परिषद निवडणुकीमध्ये शरद पवारांनी पाठिंबा देऊनही पडलेले माजी आमदार जयंत पाटलांनी (Jayant Patil ) पंढरपूरच्या शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनातच दिली.
शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी जयंत पाटलांनी शरद पवारांना निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण त्यांनी स्वीकारले देखील होते. परंतु, ऐनवेळी शरद पवारांनी आपल्याला फोन करून दिल्लीतल्या घडामोडींची माहिती दिली. त्यामुळे त्यांना वेळ नसल्याचे सांगितले, असे जयंत पाटील म्हणाले.
देशाचे नेते शरद पवार आपल्या अधिवेशनाला येणार होते. पण दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पुढच्या महिनाभरात मोठी राजकीय उलाढाल होत आहे. त्यामुळे मला माफ करा. मी अधिवेशनाला येऊ शकत नाही, असे ते मला फोनवर म्हणाले. तेव्हा मीच त्यांना म्हणालो, दिल्लीतले सरकार पाडा आणि महाराष्ट्रात या. तुमचे स्वागत करतो, असे जयंत पाटील यांनी अधिवेशनातल्या भाषणात सांगितले.
याच जयंत पाटलांना पवारांनी पाठिंबा देऊन विधान परिषदेच्या निवडणुकीला उभे केले होते. परंतु त्यांना आमदारांची फक्त 12 मते मिळू शकली. उद्धव ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांनी त्यांना पाडले, तरी देखील जयंत पाटलांनी शरद पवारांना शेकापच्या अधिवेशनाचे निमंत्रण दिले परंतु दिल्लीतल्या पुढच्या महिनाभरातल्या घडामोडींचे कारण सांगून पवारांनी अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे टाळले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App