मुंबई, : ता. २७ गेल्या तीन दिवसांपासून नकारात्मक जागतिक संकेतामुळे अत्यल्प वाढ दाखविणाऱ्या ‘सेन्सेक्स’मध्ये आठवड्याच्या अखेर १७५.६२ अंशांची वाढ झाली आणि प्रथमच तो ५६ हजारांच्या पुढे बंद झाला. त्यामुळे सोमवारी तो आणखी उच्चांक गाठणार का याबाबत गुंतवणुकदांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.Sensex crossed 56 k mrk first time in history
‘सेन्सेक्स’मधील ३० प्रमुख शेअरपैकी अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर २६६ रुपयांनी वाढून ७५७२ रुपयांवर गेला. औषधनिर्मिती क्षेत्रातील डॉ. रेड्डीज लॅब ९७ रुपयांनी वाढून ४६०१ रुपयांवर, सन फार्मा ११ रुपयांनी वाढून ७७१ रुपयांवर पोचला.
बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एअरटेल, टाटा स्टील, एचडीएफसी यांचे भावदेखील वधारले. दुसरीकडे, इन्फोसिस, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज व मारुती या शेअरचे भाव मात्र घसरले.गेले सलग चार दिवस ‘सेन्सेक्स’ ५६ हजारांना स्पर्श करून मागे येत होता; मात्र शुक्रवारी तो ५६,१२४.७२ अंशांवर बंद झाला. ‘निफ्टी’देखील ६८.३० अंशांनी वाढून दिवसअखेर १६,७०५.२० अंशांवर स्थिरावला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App