काश्मींरच्या मुद्द्यावर तालिबानने उधळळी मुक्ताफळे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा भारताला अनाहूत सल्ला


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – काश्मीर खोऱ्यातील समस्यांकडे भारताने सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे,’ असा अनाहूत सल्ला तालिबानचा प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद याने दिला आहे.पाकिस्तानमधील ‘एआरवाय न्यूज’ या खासगी वृत्तवाहिनीला मुजाहिद याने नुकतीच मुलाखत दिली.Taliban take stand on Kashmir issue

भारत व पाकिस्तानच्या वाढत्या तणावाचा उल्लेख करीत तो म्हणाला की, अण्वस्त्रसज्ज असलेल्या या दोन्ही देशांनी एकत्र बसून हा प्रश्नो सोडवायला हवा. ते दोघेही शेजारी असून त्यांचे हित एकमेकांशी निगडित आहे. अफगाणिस्तानमध्ये भारताचे अन पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. ते भारताने पूर्ण करावेत. भारताने अफगाणी नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यानुसार धोरण ठरवावे, अशी आमची इच्छा आहे.



 

अफगाणिस्तानमध्ये लवकरच सर्वसमावेशक प्रशासन स्थापन केले जाईल. त्यात सर्व अफगाणींचा समावेश असेल. अफगाणिस्तानमधील सरकार बळकट व इस्लाम धर्मावर आधारित असावे, असे आम्हाला वाटते. आम्ही त्यादृष्टिने काम सुरू केले आहे. जोपर्यंत मजबूत व स्थिर सरकार स्थापन करण्यास आम्हाला यश येत नाही, तोपर्यंत आम्ही प्रतीक्षा करू, असे मुजाहिदने सांगितले.

Taliban take stand on Kashmir issue

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात