इसिसविरोधात सर्वशक्तिमान अमेरिका झाली आक्रमक, काबूल विमानतळावरील हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – काबूल विमानतळाबाहेर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनंतर अमेरिका आक्रमक झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज हल्लेखोर दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांना याची जबर किंमत मोजायला भाग पाडू असा इशारा दिला आहे. या दहशतवादी हल्ल्यांमागे ‘इसीस’चा हात असल्याचा दावाही बायडेन यांनी केला आहे.USA warns ISIS for terrorist attack on airport

‘इसीस’ची संपत्ती, त्यांचे नेतृत्व आणि केंद्रांना लक्ष्य करण्याचा आराखडा लष्करी अधिकाऱ्यांनी तयार करावा, असे आदेशही बायडेन यांनी दिले.बायडेन म्हणाले, की ‘‘ हा हल्ला घडवून आणणारे आणि अमेरिकेला इजा पोचवू पाहणाऱ्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही.हा हल्ला आम्ही कधीच विसरू शकत नाहीत. आम्ही त्यांना शोधून काढू आणि त्याची जबर किंमत मोजायला भाग पाडू. आम्ही आमचे हित आणि लोकांचे संरक्षण करू.’’‘इसीस’ या दहशतवादी संघटनेमध्ये फारसा बदल झालेला नसून

ही बाब सध्या अफगाणिस्तानचे शासक बनलेल्या तालिबान्यांच्या पथ्यावर पडणारी असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या काळात तालिबान्यांचा अमेरिकेशी करार झाला होता त्यामुळे मागील वर्षभरात आमच्या सैनिकांवर हल्ला करण्यात आलेला नाही, असेही बायडेन यांनी नमूद केले.

USA warns ISIS for terrorist attack on airport

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती