Yogesh Tilekar, : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा प्रेम प्रकरणातून पत्नीकडूनच सुपारी देऊन खून

Yogesh Tilekar

पुणे : Yogesh Tilekar,  भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Yogesh Tilekar,

गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. केल्याचे उघड झाले आहे.



अनैतिक संबंधातून शेजाऱ्याला सुपारी देऊन मोहिनी वाघ यांनी घरापासून 37 किलोमीटर अंतरावर नवऱ्याचा खून केल्याची आता समोर आले आहे. 16 दिवसाच्या या तपासामध्ये मोहिनी वाघ हिने अनैतिक संबंधातून पाच लाखांची सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून केल्याचे समोर आले आहे. मोहिनी वाढ यांचे शेजारच्या व्यक्तीबरोबरच प्रेम प्रकरण होते. या प्रेमप्रकरणात सतीश वाघ आडवे येत होते. म्हणूनच त्यांना संपवण्यात आलं.

सतीश वाघांचा शेजारी असलेला अक्षय जावळकर याला पोलिसांनी आधीच अटक केली होती. त्यानंतर तपासामध्ये पवन कुमार शर्मा, विकास शिंदे आणि धाराशिव मधून 24 डिसेंबर रोजी आतिश जाधवला अटक केली. तिथेच पोलिसांना सारे माहिती मिळाली सतीश वाघची पत्नी मोहिनी वाघ हिला काल पोलिसांनी अटक केली.

ही घटना 9 डिसेंबरच्या पहाटे घडली होती शेवाळवाडीतील घरापासून काही अंतरावर असलेल्या लॉन्स नजीक सतीश वाघ हे मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना एका गाडीतून जबरदस्तीने देण्यात आलं आणि तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आले. त्यांचा प्रायव्हेट पार्ट ही कापण्यात आला होता.

वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली.

Satish Wagh, uncle of MLA Yogesh Tilekar, was killed by his wife due to a love affair

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात