विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांचा स्वाभिमान जरूर उफाळला, पण पुढे तो भाजपवर घसरून नंतर काँग्रेसवर “सरकला”!!
अमित शहा यांनी भाजप महा अधिवेशनात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना आयता विषय हातात मिळाला. अन्यथा तोपर्यंत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार भाजप आणि अजितदारांच्या सत्तेला सत्तेच्या वळसणीला जायला उतावळेच होऊन बसले होते, पण अमित शाह यांनी पवारांना एका वाक्यात ठोकून काढले त्यामुळे सगळ्यांची पंचाईत झाली, पण पवारांवर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विषय मिळाला तर उद्धव ठाकरेंवरच्या टीकेमुळे शिवसेनेला विषय मिळाला.
संजय राऊत यांनी रोजच्या पत्रकार परिषदेत बाहेरचे लोक येऊन ठाकरे + पवारांवर टीका करतात महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावतात आणि समोर बसलेले लोक टाळ्या भेटतात याची मला शरम वाटते, असे उद्गार काढले. भाजपवर राऊत यांनी जोरदार शरसंधान साधले पण पुढे ते काँग्रेसवर घसरले महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी टिकवणे ही काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाची जबाबदारी आहे लोकसभेत सर्व पक्षांच्या ऐक्यामुळे त्यांना चांगला परफॉर्मन्स देता आला. पण समन्वय टिकवणे, सगळ्यांशी चर्चा करणे यासाठी चांगल्या नेत्यांची नेमणूक करणे हे काँग्रेसचे काम आहे. ते जोपर्यंत काँग्रेस करत नाही, तोपर्यंत पुन्हा ऐक्य होणे कठीण आहे, असा टोला संजय राऊत यांनी काँग्रेसला हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App