शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला. फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा झाला. अमोल काळे कुठे गेला? महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत केला. भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे. Sanjay Raut Press Biggest scam in Fadnavis era, scam of Rs 25,000 crore in MahaIT, where is Amol Kale
वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला. फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा झाला. अमोल काळे कुठे गेला? महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत केला. भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.
राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांचा अजून एक फ्रंटमॅन आहे त्याचे नाव मोहित कंबोज आहे. तो फडणवीसांना बुडवणार आहे. पत्राचाळ जमिनीत कंबोजचा पैसा असून पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवान त्यांच्याकडून केबीजी ग्रुपनं 12 हजार कोटींची जागा 100 कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपचे, पैसे कुठून आलेत याची माहिती फडणवीसांना आहे, असा आरोपही त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, “किरीट सोमय्या हे वारंवार सांगतात की, राकेश वाधवान हा पीएमसी बँक घोटाळ्यातील घोटाळेबाज असून त्याचे आमच्याशी संबंध आहेत. त्यांच्या खात्यातून भाजपच्या खात्यात 20 कोटी रुपये गेले आहेत. ईडी, सीबीआय, पंतप्रधान आणि गृहमंत्री, हे लोक आता माझे भाषण ऐकतात. राकेश वाधवान यांनीच एवढा मोठा घोटाळा केला आहे. आता मी निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कोण आहे ते सांगतो. ही कंपनी किरीट सोमय्या यांच्या नातेवाईकाची आहे. किरीट सोमय्या हे पीएमसी बँक घोटाळ्याचा सूत्रधार राकेश वाधवान यांच्याशी संबंधित आहेत.
ते म्हणाले, “निकॉन फेज वन आणि निकॉन फेज II या प्रकल्पांना पर्यावरण मंजुरी नाही. राष्ट्रीय पर्यावरण विभागाने याची चौकशी केल्यास 200 कोटींचा दंड भरावा लागेल. मी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना या कंपनीवर कारवाई करण्याचे आवाहन करतो. या कंपनीत भागीदार नील किरीट सोमय्या आहे. किरीट सोमय्या यांचा मुलगा आहे. या प्रकल्पाचे सर्व व्यवहार पीएमसी बँकेत झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्या कुटुंबाचा याशी थेट संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्याची ईडी चौकशी करत आहे. गेल्या तीन महिन्यांत हे सर्व पुरावे मी तीन वेळा ईडीकडे पाठवले आहेत. तुम्ही आमच्या एक गुंठे आणि दोन गुंठे जमिनीचा हिशेब मागता.
संजय राऊत म्हणाले, “कोण आहेत जितेंद्र चंद्रलाल नलवानी? मुंबईतील ७० बांधकाम व्यावसायिकांकडून ईडीच्या नावावर वसुली सुरू आहे. हे कोण आहे? ते कोणाचे लोक आहेत? ही सर्व माहिती मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देईन. मुंबईतील 60 बांधकाम व्यावसायिकांकडून 300 कोटी वसूल करण्यात आले आहेत. ईडीच्या या मंडळींनी ऐंशी वर्षाच्या वृद्धाला इथेच मरणार, तू घरी जाणार नाही, अशी धमकी दिली.
Sanjay Raut Press Biggest scam in Fadnavis era, scam of Rs 25,000 crore in MahaIT, where is Amol Kale
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App