वृत्तसंस्था
पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती खणखणीत व्हावी, यासाठी सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक संजीवकुमार सावंत आणि त्यांच्या पत्नी रूपाली सावंत यांनी ८० किलोमीटर अंतर पायी येऊन पंढरीची वारी पूर्ण केली आहे. Sangli’s Shiv Sainiks urges Vitthal for CM’s good health: Wari with wife
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.या शस्त्रक्रियेनंतर त्यांना आराम मिळावा, यासाठी त्यांनी वारी केली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बनाळी येथील ते रहिवासी आहेत.
शस्त्रक्रिया झाल्यावर मुख्यमंत्र्यांना निरामय आरोग्य लाभावे, असे साकडे शिवसैनिक संजीवकुमार सावंत यांनी विठ्ठलाला घातले होते. त्यानुसार संजीवकुमार सावंत यांनी तीन दिवसात अनवाणी८० किलोमीटरचे अंतर पार करत पंढरीची वारी पूर्ण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची विठ्ठलावर अढळ श्रद्धा आहे. हीच भावना ठेवून संजीवकुमार सावंत यांनी त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमापोटी सपत्नीक पंढरीची पायी वारी पूर्ण केली. त्यांना दीर्घायू लाभू दे, असे विठ्ठलाला साकडे घातले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App