विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील 55 सहकारी साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली. हे कारखाने काही खासगी कंपन्यांकडून कवडीमोल पैशातून खरेदी करण्यात आले. केंद्रीय सहकार मंञी अमित शहा यांची भेट घेऊन साखर कारखान्यात झालेल्या घोटाळ्याबाबत चौकशीची मागणी आपण करणार असल्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.Sadabhau Khot accused of buying 55 sugar mills from private companies in throw away price
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मेधा पाटकर आणि अन्य नेते, समाजसेवकांनी आझाद मैदानातून कारवाईची मागणी केली होती. मात्र, शेकडो कोरी रुपये किमतीचे साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले गेल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
खोत म्हणाले, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे व्यवहार राज्य शिखर बँकेकडून झाले होते. शेकडो कोटी रुपये किमतीच्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री कवडीमोल भावाने झाली. या कारखानदारांनी दिवसाढवळ्या शेतकºयांच्या घरावर दरोडा टाकला. यात राज्याचे तब्बल 1200 कोटी रुपयांचे भाग भांडवल अडकलं आहे. हे कारखाने पुन्हा सहकारी होणं गरजेचं आहे. या कारखान्यासंदर्भात झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे
7 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या साखर कारखान्यावर 400 कोटी रुपयांचं कर्ज दिलं जातं. जरंडेश्वर साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर ऊस कुठे घालवावा असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला आहे. या कारखान्यावर प्रशासक नेमावा आणि शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावं, अशी मागणीही खोत यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App